नागपूर : ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ आणि ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. १६ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये या निमित्ताने एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काव्यवाचन आणि गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संविधान गांगुर्डे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, उपाध्यक्ष लीना खरे, प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, नितीन भुजबळ, वामन गायकवाड, राहुल सोनवणे, सागर रिपोटे, दीपक पगारे, रवी पगारे आणि विश्वनाथ भालेराव उपस्थित होते. यानंतर, ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिकची भूमिका व पुढील वाटचाल’ या विषयावर जिल्हाध्यक्ष मिहिर गजबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात काव्यवाचनाचा सुंदर सोहळा पार पडला. सम्राट संगारे, आदित्य निर्भवणे, शुभम काळे, आशिष तेलगोटे, आणि तेजल पालवे यांनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या काव्यवाचनाचे परीक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष संविधान गांगुर्डे यांनी केले. यानंतर, धम्मगौतमी धिवरे आणि आदित्य निर्भवणे यांनी महामानवास अभिवादन गीत सादर केले. त्यांना मिहिर गजबे, आशिष तेलगोटे आणि सुरज दीक्षा सुदाम यांनी साथ दिली.
यावेळी, नुकत्याच निवड झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीचा सत्कार ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक’च्या वतीने करण्यात आला. बाळासाहेब शिंदे, नितीन भुजबळ आणि वामन गायकवाड यांनीही मार्गदर्शनपर भाषणे दिली. तर, अध्यक्षीय भाषण संविधान गांगुर्डे यांनी केले.
पुण्यात समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशात बेकायदा उपवर्गीकरण? वंचित बहुजन युवा आघाडीचा आरोप
पुणे : समाज कल्याण विभागाच्या पुणे येथील वसतिगृह प्रवेश प्रक्रियेवर वंचित बहुजन युवा आघाडीने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोरेगाव...
Read moreDetails