अकोला : अकोट तालुक्यातील चोहट्टा आणि आसपासच्या गावांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEB) ने अनेक गरीब कुटुंबांना ४०,००० हजार ते ५०,००० हजार पर्यंतची अवाढव्य वीज बिले पाठवल्याने नागरिक मोठ्या मानसिक तणावाखाली आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी MSEB कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक कार्यकर्ते मुस्ताक शहा, संजय बुध, सुरेंद्र ओइंबे यांच्यासह इतरांनी ही गंभीर बाब जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आणि जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर, देंडवे आणि इंगळे यांनी कार्यकर्त्यांसह थेट चोहट्टा येथील MSEB कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी, MSEB अधिकाऱ्यांनी येत्या तीन-चार दिवसांत ही अवाढव्य बिले कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. जर हे आश्वासन पूर्ण झाले नाही, तर वंचित बहुजन आघाडी MSEB विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी मनोहर शेळके, मुस्ताक शहा, संजय बुध, गणेश खोडके, लड्डू शहा, संजय खंडारे, गोपाल ढोरे, पूर्णाजी खोडके, मुनीर शहा, तसेच चोहट्टा परिसरातील अनेक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या मागणीनंतर पालिका प्रशासन कराराचा पुनर्विचार करणार – प्रकाश आंबेडकर
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका आणि विविध कामगार संघटना यांच्यात २८ जुलै रोजी झालेल्या कराराचा फेरविचार करण्याची मागणी मुंबई म्युनिसिपल कामगार...
Read moreDetails