अकोला – वंचित बहुजन महिला आघाडीच्या अकोला जिल्हा शाखेने नुकताच रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. अकोला जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना राखी बांधून महिला आघाडीने त्यांना या सणाचे महत्त्व आणि पोलिसांची जबाबदारी याची आठवण करून दिली.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आम्रपालीताई खंडारे आणि जिल्हा महासचिव संगीताताई अढावू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना राखी बांधली. यावेळी उप-जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी (महिला आणि पुरुष) यांनाही राख्या बांधण्यात आल्या.
यावेळी महिला आघाडीच्या सदस्यांनी सांगितले की, आम्ही महिला स्वतःला ‘अबला’ मानत नाही. त्यामुळे बहिणींचे रक्षण भावांनी करावे, या विचारापेक्षाही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्याचे पालन करावे, ही आमची अपेक्षा आहे. समाजात काही वेळा रक्षकच भक्षक बनतात, असा अनुभव आपल्याला येतो. पुण्यात पोलिसांकडून नागरिकांवर झालेल्या दादागिरीच्या घटनेचा संदर्भ देत, महिलांनी पोलिसांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
यावेळी महिला आघाडीने एक पत्र वाचून दाखवले, ज्यात स्त्री-पुरुष समानतेचा आणि मानवी हक्कांच्या रक्षणाचा संदेश होता. महिलांचा सन्मान आणि समानता समजत नसेल, तर किमान रक्षाबंधनाचे महत्त्व लक्षात घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी उपस्थित महिलांना बक्षिसे दिली, तेव्हा “रक्षकच भक्षक बनू नये” हीच खरी ओवाळणी असल्याचे महिला आघाडीच्या वतीने सांगण्यात आले. हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या कार्यक्रमाला माजी जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट, जिल्हा संघटक अनुराधाताई ठाकरे, महानगर अध्यक्षा वंदनाताई वासनिक, माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती मायाताई नाईक, जिल्हा उपाध्यक्ष मीनाक्षीताई शेळके, जिल्हा सदस्य दुर्गाताई अवचार, ग्रा.पं. देवळीच्या माजी सरपंच वैशालीताई सदांशिव, अकोला तालुकाध्यक्षा मंगलाताई शिरसाट, विद्याताई धाडसे, तेजस्विनी बागडे, सरोजताई वाकोडे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
’रक्षकच भक्षक बनू नये’, पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव
अकोला - वंचित बहुजन महिला आघाडीच्या अकोला जिल्हा शाखेने नुकताच रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. अकोला जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक...
Read moreDetails