गरीबीवर मात करून विद्युत सहाय्यकपदी निवड झाल्याने सागर भवते यांनी केले सन्मानित
अमरावती : तिवसा तालुक्यातील उंबरखेड येथील अत्यंत गरीब कुटुंबातील युवक विशाल दहाट याची विद्युत सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या हस्ते विशालचा त्याच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही विशालने हार मानली नाही. त्याने शेतमजुरीची कामे करत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्याच्या याच कठोर परिश्रमामुळे अखेर त्याचे नाव विद्युत सहाय्यकच्या निवड यादीत झळकले आहे. त्याच्या या यशामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विशालच्या उंबरखेड येथील घरी जाऊन त्याचा सत्कार केला. यावेळी जिल्हा महासचिव सागर भवते यांनी विशालला शाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन व भाषणे खंड पुस्तक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
याप्रसंगी बोलताना सागर भवते म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांनी निराश न होता कठोर मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास बाळगल्यास यश नक्कीच मिळते. विशालच्या निवडीने हा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे. तर विशालने आपल्या यशाचे श्रेय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिले.
या सत्कार सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य बबलू मुंद्रे, माजी तालुका उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र दवाळे, निलेश सोनोने, सागर गोपाळे, राहुल गोपाळे, नंदू मुंद्रे, आकाश मुंद्रे, भारतीय बौद्ध महासभेचे भारत दहाट, विनोद खाकसे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या रुपाली मुंद्रे, वृषाली गोपाळे, सरिता दहाट यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो – प्रकाश आंबेडकर
अॅड. प्रकाश आंबेडकरांचे विरोधी पक्षांना आवाहन: ' ७६ लाख मतदानाच्या वाढीविरोधातील याचिकेत सहभागी व्हा'मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड....
Read moreDetails