पुणे : शहरात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज दुपारपासून शहराच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पुणेकर काहीसे हैराण झाले होते, मात्र या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
या अचानक आलेल्या पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले असून, वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; महिलांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
मुंबई : महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत पात्र महिलांना घरगुती वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने...
Read moreDetails