पुणे : पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात एका विवाहित महिलेसोबत गैरवर्तन झाल्याचा तसेच संबंधित प्रकरणात हस्तक्षेप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध नोंदवला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ पुणे शहर आणि जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
नेमकं प्रकरण काय?
1 ऑगस्ट रोजी एका विवाहित महिलेसोबत कोथरूड पोलीस ठाण्यात अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ करत अपमानजनक वागणूक दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी अशीच अपमानास्पद वागणूक दिली, या प्रकरणाचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीने अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
१) पीडित महिलेची तक्रार तात्काळ नोंदवून घ्यावी.
२) कोथरूड आणि औरंगाबाद येथील संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा.
३) संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
३) या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ निलंबित करावे.
या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा सल्लागार जी. डी. शिरसाट, योगेश गुंजाळ, राजीव भिंगारदीवे, गणेश राऊत, संदीप वाघमारे, रोहिदास डोकडे, संकेत शिंदे, रियाज शेख, गोविंद आठवले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कोथरूड पोलिस ठाण्यातील महिलांवरील अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा निषेध
पुणे : पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात एका विवाहित महिलेसोबत गैरवर्तन झाल्याचा तसेच संबंधित प्रकरणात हस्तक्षेप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक...
Read moreDetails