राजस्थान : राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी येथील एका सरकारी प्राथमिक शाळेत एक भीषण दुर्घटना घडली. शाळेचे जीर्ण छत अचानक कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून चार शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी शाळेचे कामकाज सुरू असताना अचानक छत कोसळले. त्यावेळी शाळेत सुमारे १७ विद्यार्थी उपस्थित होते. छताचा मोठा भाग कोसळल्याने विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले.
नागरिकांच्या मदतीने ढिगाऱ्याखालून सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने चार मुलांचा मृत्यू झाला होता, तर आठ जण गंभीर जखमी अवस्थेत आहेत. डांगीपुरा पोलीस ठाण्याचे प्रमुख विजेंद्र सिंह यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. या शाळेत एकूण २७ विद्यार्थी शिक्षण घेत होते.
या हृदयद्रावक घटनेबद्दल राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी वैद्यकीय मदत पुरवण्याचे आणि या घटनेच्या चौकशीचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन...
Read moreDetails