पुणे : पुण्यातील दौंड येथील न्यू अंबिका कला केंद्रात सोमवारी (२१ जुलै) रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजित पवार गटाचे भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ बाळासाहेब मांडेकर यांचा समावेश आहे. या घटनेमुळे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेमुळे हे प्रकरण आता राजकीय वळण घेण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
सोमवारी रात्री अंदाजे १०:३० ते ११:०० च्या सुमारास दौंडजवळील न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. प्राथमिक माहितीनुसार, या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, आमदार रोहित पवार यांनी एका महिलेला दुखापत झाल्याचा दावा करत या घटनेची गंभीर दखल घेतली होती. तसेच, त्यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही केला.
न्यू अंबिका कला केंद्राच्या व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीनुसार, यवत पोलिस स्टेशनमध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करत बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप आणि एका अनोळखी व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणातील चौथा आरोपी चंद्रकांत मारणे अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अटक केलेल्या तिन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या हल्ल्यामागचा नेमका उद्देश, गोळीबाराची पार्श्वभूमी आणि हे कृत्य कोणत्या कारणामुळे घडले, याचा तपास पोलीस करत आहेत.
मुंबई आणि पुण्यात Ola-Uber प्रवास ५० टक्क्यांनी महागणार?
मुंबई आणि पुण्यातील अॅप-आधारित टॅक्सी प्रवाशांना लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. Ola आणि Uber च्या ड्रायव्हर्सनी केलेल्या संपानंतर राज्य...
Read moreDetails