Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दौंड गोळीबार प्रकरणी अजित पवार गटाचे आमदाराच्या भावासह तिघांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

mosami kewat by mosami kewat
July 24, 2025
in बातमी
0
दौंड गोळीबार प्रकरणी अजित पवार गटाचे आमदाराच्या भावासह तिघांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

दौंड गोळीबार प्रकरणी अजित पवार गटाचे आमदाराच्या भावासह तिघांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

पुणे : पुण्यातील दौंड येथील न्यू अंबिका कला केंद्रात सोमवारी (२१ जुलै) रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजित पवार गटाचे भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ बाळासाहेब मांडेकर यांचा समावेश आहे. या घटनेमुळे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेमुळे हे प्रकरण आता राजकीय वळण घेण्याची शक्यता आहे.
‎
‎काय आहे प्रकरण?
‎
‎सोमवारी रात्री अंदाजे १०:३० ते ११:०० च्या सुमारास दौंडजवळील न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. प्राथमिक माहितीनुसार, या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, आमदार रोहित पवार यांनी एका महिलेला दुखापत झाल्याचा दावा करत या घटनेची गंभीर दखल घेतली होती. तसेच, त्यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही केला.
‎
‎न्यू अंबिका कला केंद्राच्या व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीनुसार, यवत पोलिस स्टेशनमध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करत बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप आणि एका अनोळखी व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणातील चौथा आरोपी चंद्रकांत मारणे अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
‎
‎अटक केलेल्या तिन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या हल्ल्यामागचा नेमका उद्देश, गोळीबाराची पार्श्वभूमी आणि हे कृत्य कोणत्या कारणामुळे घडले, याचा तपास पोलीस करत आहेत.
‎
‎

Tags: Ajit PawarmlaPoliticalpune
Previous Post

मनी लाँड्रिंग आणि सार्वजनिक पैशाच्या गैरवापराच्या आरोपांखाली अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ED चे छापे

Next Post

मेडिकलमधील निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू – वंचित बहुजन आघाडीची चौकशीची मागणी

Next Post
मेडिकलमधील निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू – वंचित बहुजन आघाडीची चौकशीची मागणी

मेडिकलमधील निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू – वंचित बहुजन आघाडीची चौकशीची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 
बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

by mosami kewat
August 25, 2026
0

सुजात आंबेडकरांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट! पुणे : "आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा...

Read moreDetails
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

August 25, 2026
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

August 25, 2026
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home