Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कल्याणमध्ये रिसेप्शनिस्टला मारहाण करणारा गोकुळ झा पोलीस कोठडीत; कोर्टात गोंधळ घालण्याचा प्रयत्न

mosami kewat by mosami kewat
July 24, 2025
in बातमी
0
कल्याणमध्ये रिसेप्शनिस्टला मारहाण करणारा गोकुळ झा पोलीस कोठडीत; कोर्टात गोंधळ घालण्याचा प्रयत्न

कल्याणमध्ये रिसेप्शनिस्टला मारहाण करणारा गोकुळ झा पोलीस कोठडीत; कोर्टात गोंधळ घालण्याचा प्रयत्न

       

कल्याण : कल्याण पूर्वेकडील एका डॉक्टरच्या क्लिनिकमधील मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी परप्रांतीय आरोपी गोकुळ झा याला कल्याण न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सुनावणीदरम्यान गोकुळ झाने न्यायालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
‎
‎कोर्टात गोकुळ झाचा गोंधळ
‎
‎आज, बुधवारी मानपाडा पोलिसांनी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत यांना कल्याण न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुनावणी सुरू असताना, गोकुळ झाने त्याच्यावर झालेली कारवाई चुकीची असल्याचा आरोप करत गोंधळ घालायला सुरुवात केली. माझ्या भावाला का ताब्यात घेतले? असा सवाल करत त्याने न्यायाधीशांसमोर आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायाधीशांनी कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यावर तो शांत झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस कोठडीत नेले.
‎
‎काय आहे नेमकं प्रकरण?
‎
‎कल्याणच्या नांदिवली परिसरातील एका रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला गोकुळ झाने बेदम मारहाण केली होती. डॉक्टरांच्या केबिनमध्ये एमआर बसलेले असल्याने, रुग्णांना काही काळ आत पाठवू नये अशी सूचना रिसेप्शनिस्टला मिळाली होती. त्यामुळे तिने गोकुळ झासह इतर रुग्णांना थोडा वेळ थांबण्यास सांगितले. मात्र, गोकुळ झा ऐकत नसल्याने, तिने त्याला आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या गोकुळने रिसेप्शनिस्टचे केस ओढून तिला मारहाण केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच पेटले.
‎
‎वेश बदलून पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न
‎
‎पोलिसांनी गोकुळ झाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतरही तो फरार होता. नांदिवली भागात अनेकजण त्याला ओळखत असल्याने, त्याने वेश बदलून पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर अंबरनाथमधील नेवाळी नाका येथे काही मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला पकडून मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
‎
‎सराईत गुन्हेगार आहे गोकुळ झा
‎
‎गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. चार दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर मंगळवारी त्याने रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण केली. त्याच्यावर यापूर्वी हत्यार बाळगणे आणि मारहाण करणे यासारख्या काही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती आहे.


       
Tags: crimeKalyanReceptionist assault
Previous Post

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार: कोकणात ‘रेड अलर्ट’, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

Next Post

पाटोदा तलावामुळे लिंबे वडगाव दलित वस्तीचा संपर्क तुटला; तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी

Next Post
पाटोदा तलावामुळे लिंबे वडगाव दलित वस्तीचा संपर्क तुटला; तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी

पाटोदा तलावामुळे लिंबे वडगाव दलित वस्तीचा संपर्क तुटला; तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
बातमी

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

by mosami kewat
November 5, 2026
0

डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...

Read moreDetails
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home