वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. गुप्त माहितीच्या आधारे कोळी तुळजापूर शिवारातील दोन गोदामांवर धाड टाकून प्रशासनाने सुमारे ६५० पोती रेशनचा तांदूळ जप्त केला आहे, ज्याची अंदाजित किंमत ७ लाख रुपये आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही गोदामांना सील करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा येथील अमिर गुंगीवाले यांच्या मालकीच्या गोदामांमध्ये हा रेशनचा तांदूळ साठवला जात होता. गोदाम क्रमांक १ मध्ये ३५० ते ४०० पोती तर गोदाम क्रमांक २ मध्ये २२० ते २५० पोती तांदूळ आढळून आला. हा प्रचंड साठा गोरगरिबांना मिळणाऱ्या स्वस्त धान्य योजनेतील असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, प्रशासनाकडून गोदामांचा नेमका वापर कशासाठी केला जात होता, धान्याचा स्रोत काय होता आणि तो कोणत्या मार्गाने कुठे तस्करीसाठी वापरला जाणार होता, याची उत्तरे शोधली जात आहेत. या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपने सर्वांनाच गंडवले आहे! – ॲड. प्रकाश आंबेडकर
मुंबई : महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा...
Read moreDetails