Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मोठी बातमी! बांगलादेश हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले

mosami kewat by mosami kewat
July 21, 2025
in बातमी, विशेष
0
मोठी बातमी! बांगलादेश हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले

मोठी बातमी! बांगलादेश हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले

‎बांगलादेश – बांगलादेशची राजधानी ढाका येथील उत्तरा परिसरातील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सोमवारी (21 जुलै 2025) दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास बांगलादेश हवाई दलाचे एक F-7 BGI प्रशिक्षण जेट विमान कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या भीषण अपघातात विमानाचा पायलट शहीद झाला असून, शाळेच्या आवारात विमान कोसळल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.
‎
‎प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, विमान कोसळताच शाळेच्या कॅम्पसमध्ये एकच गोंधळ उडाला. अपघातामुळे कॅम्पसचे मोठे नुकसान झाले असून, परिसरात सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले होते. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही, ज्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
‎
‎अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, प्रशासनाने याची चौकशी सुरू केली आहे. घटनेची माहिती मिळताच बांगलादेश लष्करी सैन्य, सिव्हिल डिफेन्स पथक आणि अग्निशमन दलाच्या तुकड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखालून आणि बाधित झालेल्या परिसरातून मदतकार्य वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे ढाका शहरात शोककळा पसरली आहे.

Tags: Air ForceAircraft crashBangladeshJet Crash
Previous Post

पुण्याजवळ वेद विहार समोर भीषण अपघात; रिक्षा चालकाची थरारक सुटका

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण परिपत्रकाची वंचित बहुजन आघाडीने केली होळी

Next Post
जिल्हाधिकाऱ्यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण परिपत्रकाची वंचित बहुजन आघाडीने केली होळी

जिल्हाधिकाऱ्यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण परिपत्रकाची वंचित बहुजन आघाडीने केली होळी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इस देश में रहना होगा, तो संविधान को मानना होगा : सुजात आंबेडकर
बातमी

इस देश में रहना होगा, तो संविधान को मानना होगा : सुजात आंबेडकर

by mosami kewat
November 25, 2025
0

युवा नेते सुजात आंबेडकरांचे RSS ला थेट आव्हान! मुंबई : वंचित बहुजन आघाडीने (VBA) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २५ नोव्हेंबर रोजी...

Read moreDetails
मुंबईत संविधान सन्मान महासभेत संविधानाचा जागर

मुंबईत संविधान सन्मान महासभेत संविधानाचा जागर

November 25, 2025
मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवर उपस्थित राहणार

मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवर उपस्थित राहणार

November 25, 2025
मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; संविधानप्रेमी जनतेने उपस्थित राहण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; संविधानप्रेमी जनतेने उपस्थित राहण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

November 25, 2025
मुंबईत वंचितच्या ‘संविधान सन्मान महासभे’ची जय्यत तयारी; युवा नेते सुजात आंबेडकरांकडून तयारीचा आढावा

मुंबईत वंचितच्या ‘संविधान सन्मान महासभे’ची जय्यत तयारी; युवा नेते सुजात आंबेडकरांकडून तयारीचा आढावा

November 24, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home