लातूर : जमीयतुल कुरेशी समाजातर्फे लातूर जिल्हा समितीने कुरेशी समाजावरील अन्याय, गोवंश हत्या बंदी कायदा आणि जनावरांच्या खरेदी-विक्रीवरील अनावश्यक निर्बंधांविरोधात तीव्र जनआंदोलन छेडले. या आंदोलनात महाराष्ट्र सरकारच्या अन्यायकारक धोरणांचा जोरदार निषेध करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून कुरेशी समाजावर होत असलेला अन्याय आणि गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे त्यांच्या व्यवसायावर होत असलेल्या परिणामांना वाचा फोडण्यासाठी जमीयतुल कुरेशने हे पाऊल उचलले आहे.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. त्यांनीही आंदोलकांना पाठिंबा देत सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. आंदोलकांनी गोवंश हत्या बंदी कायद्याचा निषेध करत, यामुळे कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर विपरित परिणाम होत असल्याचे म्हटले.
तसेच, जनावरांच्या खरेदी-विक्रीवर लादण्यात आलेल्या अनावश्यक निर्बंधांमुळेही समाजाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. जमीयतुल कुरेशच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला रोष व्यक्त केला.
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक: ‘हिटलरशाहीचा उदय’, वंचित बहुजन आघाडीचा आरोप
वडवणी : महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक १० जुलै २०२५ रोजी विधानसभा आणि विधान परिषदेत बहुमताने मंजूर झाल्याने, वंचित बहुजन आघाडीने या...
Read moreDetails