शेवगाव – अहमदनगर १४ मे २३ रोजी शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या मिरवणुकीच्या दरम्यान रात्री जी दंगल झाली त्यादिवशी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसनराव चव्हाण त्यांच्या नियोजीत दौ-यावर छ. संभाजीनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला गेले होते. १४ मे रोजी सकाळी ७.३० च्या दरम्यान ते शेवगाव वरून निघाले व रात्री छ. संभाजीनगर येथून ते १०.३० दरम्यान शेवगावला त्यांच्या निवासस्थानी परत पोहचले होते. दरम्यानच्या काळात शेवगावची दंगल घडून गेलेली होती. तरी ही त्याकाळचे तात्कालीन उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके, अजित पाटील. पीआय विलास पुजारी व पीआय संतोष मुटकूळे यांनी संगनमत करून प्रा. किसन चव्हाण यांच्यावर दंगलीचा खोटा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर प्रा. किसन चव्हाण यांनी मा. जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे त्याच्या वकीलामार्फत अटकपूर्व जामीन दाखल करून खरी परीस्थिती कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली.
कोर्टाने प्रा. किसन चव्हाण यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर खोट्या गुन्हात अडकवले असल्याने प्रा. किसन चव्हाण यांनी तात्कालीन उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके, अजित पाटील. पीआय विलास पुजारी व संतोष मुटकूळे यांच्या विरोधात सीआरपीसी १५६/३ नुसार मे. जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे भादवी कलमानूसार व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार अर्ज दाखल केला होता. त्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश लोणे साहेब यांनी आदेश पारीत करून शेवगाव पोलीसांनी यावर त्याचे म्हणने दाखल करावे असा आदेश पारीत केला होता. परंतु दोन वर्ष उलटूनही शेवगाव पोलीसांनी आजतागायत त्याचे म्हणने मांडले नसल्याने प्रा. किसन चव्हाण यांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे याचीका दाखल केली होती व त्यावर मा. उच्च न्यायालयाने आदेश पारीत करून शेवगाव पोलीसांनी त्वरीत अहवाल सादर करावा असा आदेश पारीत केलेला आहे. पुढची सुनावणी ७ ऑगस्ट २०२५ रोजी मे जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर न्या. लोणे यांच्यासमोर होणार आहे.
प्रा चव्हाण यांच्यावतीने ऍड दिपक शामदिरे, ऍड कृणाल सरोदे व अॅड किरण जाधव हे कामकाज पाहत आहे.