पुणे : पुणे शहरात गेल्या साडेतीन वर्षांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. जानेवारी २०२२ ते जून २०२५ या कालावधीत चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत तब्बल ७३ कोटी ६० लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले आहे.
यात सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, चोरीला गेलेल्या ऐवजापैकी पोलिसांना केवळ १३ कोटी ४१ लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात यश आले आहे.
गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी
पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार, या साडेतीन वर्षांत शहरात घरफोडीचे एकूण २,०१९ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ८८६ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे, जे सुमारे ४३.८८% आहे. म्हणजेच, निम्म्याहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांतील चोरटे अद्याप मोकाट आहेत. या वर्षी (२०२५) जून अखेरपर्यंत २०५ घरफोड्या झाल्या असून, त्यापैकी ६७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
घरफोड्या वाढण्याची प्रमुख कारणे
१) शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या:
पुणे शहराचा वेगाने विस्तार होत असून, नोकरी आणि रोजगाराच्या शोधात अनेक लोक बाहेरगावाहून येथे स्थायिक होत आहेत. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींमुळे उपनगरांमध्ये लोकवस्ती वाढली आहे.
२) व्यस्त जीवनशैली:
नोकरीनिमित्त अनेक रहिवासी सकाळी लवकर बाहेर पडतात आणि रात्री उशिरा घरी परततात. यामुळे दिवसभरात घरे रिकामी राहत असल्याने चोरट्यांना घरफोडी करण्याची संधी मिळते.
३) दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्या:
आता दिवसाढवळ्या घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. चोरटे सोसायट्यांमध्ये सहज प्रवेश करतात, बंद सदनिकांची रेकी करतात आणि घरफोडी करतात. सर्वाधिक प्रभावित क्षेत्र पुणे पोलिसांच्या परिमंडळ ५ मध्ये सर्वाधिक घरफोड्या झाल्या आहेत. या परिमंडळात कोंढवा, हडपसर, बिबवेवाडी, वानवडी आणि उंड्री या भागांचा समावेश आहे. गेल्या साडेतीन वर्षांत या परिसरात ८२२ घरफोड्या झाल्या असून, त्यापैकी ३३४ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलिसांसमोर हे गुन्हे रोखण्याचे आणि उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान आहे.
Jalna : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावलेले सेंगोल तत्काळ हटवा – वंचित आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा
जालना : जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या संविधान हत्या दिवस २०२५ या आशयाच्या बॅनरवरून नवा वाद निर्माण झाला...
Read moreDetails