Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Gujarat Bridge Collapse : गुजरातमध्ये भीषण पूल दुर्घटना: ३ ठार, प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप ‎

mosami kewat by mosami kewat
July 9, 2025
in बातमी
0
महिसागर नदीवरील ४५ वर्षे जुना पाड्रा-गंभीरा पूल कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत.

महिसागर नदीवरील ४५ वर्षे जुना पाड्रा-गंभीरा पूल कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत.

       

वडोदरा : गुजरातमध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. वडोदरा आणि आनंद जिल्ह्यांना जोडणारा, महिसागर नदीवरील ४५ वर्षे जुना पाड्रा-गंभीरा पूल कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेत दोन ट्रक, एक बोलेरो आणि एक जीपसह चार वाहने नदीत कोसळली. ‎ ‎सकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पूल कोसळल्यानंतर एक टँकर पुलावर लटकलेल्या अवस्थेत होता. तर चार वाहने थेट महिसागर नदीत पडली. यावेळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आतापर्यंत तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. ‎

‎स्थानिक मुजपूर गावासह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्यात मदत केली. पाड्रा पोलीसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली. ‎ ‎या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक दशकांपासून जुना झालेल्या या पुलाच्या दुरुस्तीसाठी वारंवार विनंत्या करण्यात आल्या होत्या, मात्र प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. असे आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

आम्ही अनेकदा इशारा दिला होता की हा पूल जड वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नाही आणि त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. ‎ ‎स्थानिकांच्या मते, पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते आणि गेल्या काही वर्षांपासून त्याची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडली आणि त्यात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. ‎घटनास्थळी १०८ रुग्णवाहिका दाखल झाल्या असून, प्रशासनाचे पथक नदीत कोसळलेली वाहने बाहेर काढण्याचे काम करत आहे.


       
Tags: bridgecollapseGambhiraGujarat
Previous Post

Monsoon News : नागपुरात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर‎‎

Next Post

Crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई: २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त, दोघे अटकेत‎‎‎

Next Post
Crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई: २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त, दोघे अटकेत‎‎‎

Crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई: २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त, दोघे अटकेत‎‎‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६: वंचित-काँग्रेस युतीचे बिगुल; सहा उमेदवारांचे अर्ज दाखल
बातमी

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६: वंचित-काँग्रेस युतीचे बिगुल; सहा उमेदवारांचे अर्ज दाखल

by mosami kewat
December 31, 2025
0

मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस महायुतीच्या...

Read moreDetails
राजकीय वर्तुळात चर्चेत असणारा 'एबी फॉर्म' म्हणजे नक्की काय? ज्यासाठी उमेदवारांची लागते रांग!

राजकीय वर्तुळात चर्चेत असणारा ‘एबी फॉर्म’ म्हणजे नक्की काय? ज्यासाठी उमेदवारांची लागते रांग!

December 31, 2025
नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची प्रभागनिहाय २१ उमेदवारांची यादी जाहीर

नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची प्रभागनिहाय २१ उमेदवारांची यादी जाहीर

December 31, 2025
मुंबई महानगरपालिका निवडणूक: वॉर्ड १३९ मधून स्नेहल सोहनी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई महानगरपालिका निवडणूक: वॉर्ड १३९ मधून स्नेहल सोहनी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

December 30, 2025
बीड अत्याचार प्रकरण :  सहआरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा राज्यभर आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा पोलिसांना इशारा

बीड अत्याचार प्रकरण :  सहआरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा राज्यभर आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा पोलिसांना इशारा

December 30, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home