Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home विशेष

वैष्णवी हगवणे/कस्पटे हत्या : आधी कोपर्डीचे सांगा! मग ठरावाचे बोला!

mosami kewat by mosami kewat
June 24, 2025
in विशेष, संपादकीय
0
वैष्णवी हगवणे/कस्पटे हत्या : आधी कोपर्डीचे सांगा! मग ठरावाचे बोला!

वैष्णवी हगवणे/कस्पटे हत्या : आधी कोपर्डीचे सांगा! मग ठरावाचे बोला!

       

कोपर्डीतील तरुणीच्या हत्येनंतरचे मराठा जनतेचे शिस्तबध्द विराट क्रांती मोर्चे झाले. आणि आता मराठ्यांच्या सभांचे नेते मनोज जरांगे पाटील फक्त आणि फक्त सरसकट मराठा आरक्षणाची मागणी करत सुटले आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते १९९३-९४ पासून सतत स्पष्टपणे सांगत आहेत,”मूठभर सत्ताधारी मराठा घराणी, जातीचा फुकट अभिमान सांगत सा-या गरीब-कष्टकरी मराठा समाजाला बेछूटपणे लुबाडत आहेत आणि राजरोजपणे फक्त या बड्यांच्यासाठी सारी सत्ता राबवत-उपभोगत आहेत.”

या घटनाविरोधी मागणीला खालच्या – वरच्या सर्व न्यायालयांनी नकार दिला. मग सल्लागारांच्या आदेशानुसार जरांगे पाटिलांनी ही आरक्षणाची पंक्चर्ड गाडी घुसवली; भटके-विमुक्त-ओबीसी समूहाला मिळालेल्या आरक्षणात! आठवा या बनेल सत्ताधारी कुटुंबांची बदमाशी, घुसखोरी! आधी अण्णासाहेब पाटील यांना पुढे करून जात आधारित आरक्षणाला कडाडून विरोध केला आणि जाती ऐवजी आर्थिक निकषावरच आरक्षण हवे म्हणू लागले. हे अंगलट येताच; हे बदमाश आता सरसकट मराठा आरक्षणाची मागणी करतात. तिचीही अशी वासलात लागताच, हे ओरबाडून घेवू लागले; दुस-यांच्या ताटातले! आता पुढचाच विचार करा; सत्ता टिकते की नाही! एक विसरत आहेत; जेवढी घुसखोरी हे करत राहातील; तितके आपसातले मतभेद विसरतील. आणि अन्य वंचित समूह संघटित होत जातील. भुजबळ, जानकर, पडळकर यांना पुढे करून जागृत होवू मागणा-यांना गुंडाळायचाही प्रयत्न करत राहातील. पण, बाळासाहेब दुस-या बाजूने तमाम वंचित बहुजनांच्या सामाजिक – राजकीय हातोड्याने खिळखिळ्या होत जाणा-या यांच्या पारंपरिक सत्तेला खिंडार पाडत जात आहेत, हे नक्कीच!

परंतु, केवळ तुलनात्मक ताकद थोडीशी मोठी असली; तरी “एक मराठा, लाख मराठा” अशी घोषणा देत राहिले. रिकाम्या पोटी राहणा-या गरीब मराठ्यांना बहकवत राहिले. आणि महाराष्ट्रातील सर्व जाती-जमातींमधील सर्वांत मोठी, सर्व शक्तिमान जात म्हणजे फक्त आणि फक्त मराठाच! असे सांगत सुटले. आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामान्य वंचितांवर-स्त्रियांवर वर्चस्व दाखवत राहिले; हा इतिहास आहे. पण, कुणीही अनु.जाती-जमाती, ओबिसींमधील तथाकथित अभ्यासक-विचारवंत-पत्रकार या अजब जात गणिताची साधी आकडेमोड करू शकले नाहीत. ना या वर्चस्वाविरुध्द बोलले—ना लिहीले. कारण ते ज्या वाड्याच्या मागच्या दारात उभे आहेत; तो वाडाच या सत्ताधारी, श्रीमंत, वर्चस्ववादी मराठा घराण्यांचा आहे! मग वाटच पाहत राहाणार पुढच्या आदेशाची!

सोशल मीडियावर पुढचा फोटो असेल; शाखेवर निळी ऐवजी काळी टोपी घालून “नमस्ते सदा वत्सले…….” म्हणतानाचा फोटो असेल! आणि हाच एकेकाळचा आमचा मित्र, ज्याने कांशिरामजींना आदर्श मानून, सदा राहात आहेत. त्यांनी संघाच्या मोदींचे स्वत:च्याच भाषणात तोंडात फेस येईपर्यंत अजब तर्कशास्त्र, घटनाविरोधी भाषण करत, अकलेचे तारे तोडत संघाला शरण गेले आहेत. सोशल मीडियावर फिरताना जे ऐकले. ते म्हणत आहेत, “दिल्लीत ताकद आहे…..बाबासाहेब आंबेडकर गेले. दलितांसाठी ३४० वं कलम. पण, आपल्यासाठी कलम लिहिलं गेलं नाही.” हे महाशय घटनेचीच शपथ घेऊन माजी मंत्री (?) बनवले गेले होते! आता चिमूटभरही मंत्रिपद मिळत नाही, म्हणून हा संघाचा आवडता फंडा वापरायला लागले! सा-यांची लाचारी आमदार, खासदार, मंत्री वा मागच्या दारात शिळा पाका भाकर टुकडा मिळतो का ते बघण्यासाठी! नाराज झाल्यावर मात्र सारे घसरतात; बाळासाहेब आंबेडकर व वंचित ब. आघाडीवर! हे कोणते सामाजिक-राजकीय अंकगणित? हा कोणता शहाणपणा? मराठ्यांच्या या दोन्ही मोर्च्यादरम्यान, आधी व नंतरही गावागावात कोणत्या स्वरूपाची दहशत पसरवली गेली? या टिळक भवनींना माहीत तरी आहे का? इथंपर्यंत त्यांची समज तरी वाढलीय का?

येथे हे सारं सांगायची दोन मुख्य कारणं आहेत. एक.. सध्या गाजत असलेले वैष्णवी हत्याकांड, पाठोपाठ पुढे येत असलेल्या या दोन्ही घरच्या संपत्तीचा माज दाखवणा-या निर्लज्ज बातम्या! या विकृत कैफात बिचा-या वैष्णवीची हत्त्या मागे पडते की काय असेही वाटतेय. दरम्यान, काही मराठा नवीन नेत्यांची बातमी येते. तेही आता सर्व समाजाच्याच नावाने बोलू लागले! हुंडा मागणा-या कुटुंबाबरोबर रोटी-बेटी व्यवहार बंद. त्या कुटुंबावर बहिष्कार घालण्याचा निर्णय. हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. शुभेच्छा समाजाला! पण, मरमर करून, ऊन्हातानात काम करून कमावलेल्या (?) त्या मूठभर मराठा नेते व या हगवणे, कस्पटेंच्या अफाट संपत्तीवर जरा बोला ना? अशांनाही गरीब-कष्टकरी-कोरडवाहू मराठा समाजाबरोबर आरक्षण देणार का? तमाम मराठा पुढा-यांनी, आपल्याच घरात मुख्यमंत्रीपद, मुलगा आमदार, दुसरा मुलगा खासदार. मेडिकल कॉलेजही याच नारायण राणेंच्या घरात! अशा शंभरावर मराठा कुटुंबावर जरांगे पाटील, खेडेकर, बहिष्कार घालणार का?

त्याचबरोबर बौध्द, मातंगादी कुटुंबावर सामाजिक बहिष्कारादी अन्याय-अत्याचार करणा-यांना पाठिशी घालणा-या गावोगावच्या बड्या मराठा कुटुंबाबाबत जरासाच बहिष्कार व वरील निर्णय करणार का? जातीच्या नावाखाली तोंड भरून माती खावी हा खूप मोठा भूलभूलैय्या आहे! जाती अभिमान फुकटचाही नको, असे म्हणायची गरज आहे. बरे हे कशाविषयी बोलत आहेत? हुंड्याविषयी. त्यासाठी बिचा-या वैष्णवीचा बळी द्यायचा का? एखादी बहीण गेल्यावरच हे सारे कसे सूचते? कोपर्डीच्या बहिणीची हत्या झाली. प्रचंड क्रांती मोर्चे काढलेत. पुढे त्या केसचे काय झाले? कोपर्डीच्या बहिणीला विसरून थेट सरसकट आरक्षणावर का आलात? सत्ताधारी मराठा कुटुंब नेत्यांच्या तालावरच सारे होतेय ना? लोकसभा-विधानसभा -२०१९-२४ ची मतं कुठे गेली? एक मराठा, लाख मराठा..म्हणणा-यांनी उत्तर द्यावे, संघ-भाजपचे सरकार येतेच कसे? आधी उध्दव ठाकरे, मग एकनाथ शिंदे आणि आता तर संघाचे कट्टर, घटनाविरोधी देवेंद्र कसे काय मुख्यमंत्री होतात? यांना खुर्चीवर बसवणारे हुजरे शिंदे, पवारच ना? गरीब, कष्टकरी मराठा बिचारा जागेवरच राहिला कोरडवाहू वावरात घाम गाळत!

तेव्हा हे सत्ताधारी मराठ्यांना सरसकट आरक्षण देवूच शकत नाहीत आणि गरीब मराठ्यांना तर कधीच आरक्षण देणार नाहीत! उलट, राज्यघटनाच ते बदलत निघाले आहेत. मग हेच पुरोहित तुमच्याच लग्नात सांगणार हुंडा कसा आवश्यक आहे. असेच ना जरांगे पाटील? हेच सांगणार बिचा-या मुलीला मंगळ आहे म्हणून आणि हेच सांगणार आमच्या मार्फत, अमकी पूजा केलीत की मंगळ दूर होईल व लग्न सुरळीत होईल! किती लाचारी या संघीयांसमोर? त्यावेळी स्वाभिमान, मराठा बाणा, क्षत्रियत्व कुठे जाते? आमचे सच्चे फुले-शाहू-आंबेडकरी बौध्द, काही दलित अशा लाडावलेल्या बौध्द भिक्खूंना कधीच सोडत नाहीत. ते अशांची चांगलीच हजेरी घेतात? मग आहे तयारी आमच्या सोबत या महालबाड कायम सत्ताधारी मराठा घराण्यांना जाब विचारण्याची? आहे तयारी या लबाड पुरोहित जमातीची हजेरी घ्यायची? सत्तेला चिकटून बसलेल्यांना सत्तेवरून खाली खेचण्याची? हेच प्रश्न आमच्या ओबीसी बहिणी-भावांनाही विचारत आहोत! विचारणार प्रश्न जानकर, मुंडे, भुजबळ, पडळकरांना? सत्तेच्या लालचींना!

त्यामुळे हुंडा देणा-यांवर बहिष्कार हे सारे नाटक तर नाही ना? आधी ब्राह्मणशाही-पुरोहितशाही आणि भांडवलशाही हटवा. घर भरणी, निवडणुकीत फॉर्म भरताना मुहूर्त पाहाणे, लग्न, पूजा, आदी वेळेचे पुरोहित हाकला. मग हुंड्याचे पाहू. आधी कोपर्डी, वैष्णवी हत्याकांडांचे सलग काही वर्षे पाठपुरावा करा. त्या काळात आरक्षणाला जरा विश्रांती द्या. संघ-भाजपकडे जाणा-या मराठा आमदार-खासदारांचा बंदोबस्त करा. कोणत्याही पक्षाकडून गरीब मराठा तरुण निवडणुकीत निवडून येतील हे मिळून पाहू. आहे तयारी?

वैष्णवीच्या लग्नातील सासर-माहेरचे दोन्ही बाप सारखेच दोषी आहेत. संपत्तीचा नंगानाच कमी होता म्हणून आता हयात नसलेल्या वैष्णवीच्याविरोधात शेवटचे हुकमी हत्त्यार उपसले गेलेय. तिच्या चारित्र्यावर संशय घेतले जात आहेत. जरी क्षणभर हे सारे व याही पेक्षा अधिक आरोप मान्य केले,तरी तिची हत्या कशी समर्थनीय ठरते? आणि या सा-यावर संघाचे स्मार्ट फडणवीस चूप कसे? त्यांची बडबडी, हुशार फडणवीस बाई आता गप्प कशा?

इतक्यात भाजप खासदार किरण खेर बाईंनी तर अकलेचे खूपच तारे तोडल्याची बातमी फिरत आहे. त्या म्हणाल्याचे समजते, “सेक्स और बलात्कार हमारी संस्कृती का अहम हिस्सा है. वह खुले में हो या बंद कमरे में. हम इसे रोक नहीं सकते.” तरीही आजवर संघाची व त्याच्या परिवारातील जुने आणि चटावेले कॉंग्रेसी-राष्ट्रवादीवाले, काही शिवसेनेवाले यावर कहीही बोलणारच नाहीत हे ठाऊकच आहे. आणि संघ परिवारातील साधू-साध्वीही अशाच बोलत राहातात हेही ठाऊक आहे. आणि जगभर राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, कमालीची नैतिकता, सैनिकी शिस्त दाखवणारे संघाचे भागवत नेहमीप्रमाणे गप्पच? मोदींकडून तर अपेक्षाच नाही. चांगलं चाललंय संघ-भाजपचीच माणसं त्यांच्या पोटातील सत्य, तोंडाद्वारे ओकत आहेत.

वैष्णवीवर सासरचे विविध आरोप करत सुटले आहेत. लग्नात ती खूश असल्याचे फोटो फिरवताहेत, हगवणे राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या सोबतच्या की काय कुणासोबत तरी सिनेमात पैसे गुंतवताहेत, अशीही बातमी फिरतेय. चहूकडून नवरीच्या आई-वडिलांना लूटताहेत आणि ते लुटूही देताहेत…कारण दुस-याचे धन-नकोशी मुलगी. मुलगी जन्मताच म्हणायचे, “पहिली बेटी, धनाची पेटी,”आणि मग म्हणत राहायचे “मुलगी दुस-याचे धन आहे,”….“तिला दुसरीकडे “नवरा-बैल बाजारात” खपवायचेच (विकायचे!)”

असे करता करता, एकदा लग्न लावले की मुलगीची सासरी पाठवणी करताना, ती रडत असताना तिला सांगायचे, “बेटा, आता सासरी उभ्याने जा; आणि बाहेर येताना आडवी ये. (म्हणजे मेलेलीच ये! बाहेर तिरडीवरूनच ये!)” नाका-कानात कापसाचे बोळे घालून वैष्णवी बनूनच घराची चौकट ओलांडून ये. स्त्रीविषयक अशी मनुस्मृतीची विषमतावादी, विकृत दृष्टी असली की, असे क्रूर वागणे येतेच. नुसते शालेय शिक्षण-उच्च शिक्षण, अफाट पैसा याचा आणि स्वातंत्र्य, समता, मैत्रिभावयुक्त दृष्टिकोनाचा काहीही संबंध नसतो. हे परत परत घडणा-या घटनांवरून दिसते. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जोतीराव फुले हे शिक्षणविषयक दृष्टिकोन सांगताना, प्रज्ञा, शील, करुणा, निती, निश्चित दिशा असलेला वेग म्हणजेच गति आणि शेवटी मग अर्थार्जन सांगतात. ते यासाठीच! आज हा आशय शिक्षणातून गायबच केला गेला आहे.

केवळ पैसा आणि पैसा आणि पैसाच हे एकमेव उद्दिष्ट पुढे आणले गेलेय! यात थांबणे नाहीच. मग वैष्णवीसारख्या बहिणी आडव्या झालेल्या दिसणारच! बाबासाहेबांच्या न झालेल्या भाषणातील “नोशन्स” व त्यावर आधारित सारी प्रस्थापित व्यवस्था समजून कृतीची सुरुवात करण्यासाठी परत परत ते भाषण पारायणासारखे वाचायला पाहिजे. मुस्लिमविरोधी रा.स्व.संघवाले आणि त्यांची थिंक टॅंक अजून तरी केवळ बाबासाहेबांच्या “थॉट्स ऑन पाकिस्तान” मधील एखाद-दुसरे वाक्य मागचा पुढचा कोणताही संदर्भ न देता सोयीने सोशल मीडियातून फेकत असते. ते मागे पुढे जात (चातुर्वर्ण्य व्यवस्थाधिष्ठीत जात व्यवस्था नाही.) आम्ही कशी मानत नाही अशी लहान लेकरं समजून काहीही बोलू लागतात. त्या ब्राह्मणी चकव्याला सडेतोड उत्तर आपण ओबीसी-भटके विमुक्त, मुस्लीम आणि स्त्रियांनी प्रथम दिले पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकरवादी बौध्द, मातंगादी समूह यावर त्यांचे थोबाड लाल करतीलच.

ब्राह्मणगाव, बावडा, गवई बंधूंचे डोळे काढणे …पुढे कसा आगडोंब उठला? कारण? तो आक्रमक मार्ग बरोबर की चूक नंतर पाहू. पण,नोशन्स आधारित ब्राह्मणी व्यवस्था उदध्वस्त करण्यासाठी त्यामागील मनामनातील संताप ही पहिली पूर्व अट आहे. बंड ही न्याय स्थापनेची सुरुवात असते. उलट, कॉंग्रेस गट आणि संघ परिवार अशी बंडं होवूच नये म्हणून घुसखोरी करतच राहाणार आहे! म्हणूनच व्यवस्था समर्थक राजकीय सत्तेविरुध्द स्री शुद्रातिशूद्रांना एल्गार पुकारावाच लागतो. म्हणूनच पल्लवी हगवणे/कस्पटे हत्येबाबत बोलावे लागत आहे, “मराठा मित्रांनो आधी कोपर्डीचे सांगा! मग बहिष्कार ठरावावर बोलू!….जयभिम!”

– शांताराम पंदेरे
मोबा.: ९४२१६६१८५७


त्याचबरोबर बौध्द, मातंगादी कुटुंबावर सामाजिक बहिष्कारादी अन्याय-अत्याचार करणा-यांना पाठिशी घालणा-या गावोगावच्या बड्या मराठा कुटुंबाबाबत जरासाच बहिष्कार व वरील निर्णय करणार का? जातीच्या नावाखाली तोंड भरून माती खावी हा खूप मोठा भूलभूलैय्या आहे! जाती अभिमान फुकटचाही नको, असे म्हणायची गरज आहे. बरे हे कशाविषयी बोलत आहेत? हुंड्याविषयी. त्यासाठी बिचा-या वैष्णवीचा बळी द्यायचा का? एखादी बहीण गेल्यावरच हे सारे कसे सूचते? कोपर्डीच्या बहिणीची हत्या झाली. प्रचंड क्रांती मोर्चे काढलेत. पुढे त्या केसचे काय झाले? कोपर्डीच्या बहिणीला विसरून थेट सरसकट आरक्षणावर का आलात? सत्ताधारी मराठा कुटुंब नेत्यांच्या तालावरच सारे होतेय ना? लोकसभा-विधानसभा-२०१९-२४ ची मतं कुठे गेली? एक मराठा, लाख मराठा..म्हणणा-यांनी उत्तर द्यावे, संघ-भाजपचे सरकार येतेच कसे? आधी उध्दव ठाकरे, मग एकनाथ शिंदे आणि आता तर संघाचे कट्टर, घटनाविरोधी देवेंद्र कसे काय मुख्यमंत्री होतात? यांना खुर्चीवर बसवणारे हुजरे शिंदे, पवारच ना? गरीब, कष्टकरी मराठा बिचारा जागेवरच राहिला कोरडवाहू वावरात घाम गाळत! तेव्हा हे सत्ताधारी मराठ्यांना सरसकट आरक्षण देवूच शकत नाहीत आणि गरीब मराठ्यांना तर कधीच आरक्षण देणार नाहीत! उलट, राज्यघटनाच ते बदलत निघाले आहेत. मग हेच पुरोहित तुमच्याच लग्नात सांगणार हुंडा कसा आवश्यक आहे. असेच ना जरांगे पाटील? हेच सांगणार बिचा-या मुलीला मंगळ आहे म्हणून आणि हेच सांगणार आमच्या मार्फत, अमकी पूजा केलीत की मंगळ दूर होईल व लग्न सुरळीत होईल! किती लाचारी या संघीयांसमोर? त्यावेळी स्वाभिमान, मराठा बाणा, क्षत्रियत्व कुठे जाते? आमचे सच्चे फुले-शाहू-आंबेडकरी बौध्द, काही दलित अशा लाडावलेल्या बौध्द भिक्खूंना कधीच सोडत नाहीत. ते अशांची चांगलीच हजेरी घेतात? मग आहे तयारी आमच्या सोबत या महालबाड कायम सत्ताधारी मराठा घराण्यांना जाब विचारण्याची? आहे तयारी या लबाड पुरोहित जमातीची हजेरी घ्यायची? सत्तेला चिकटून बसलेल्यांना सत्तेवरून खाली खेचण्याची? हेच प्रश्न आमच्या ओबीसी बहिणी-भावांनाही विचारत आहोत! विचारणार प्रश्न जानकर, मुंडे, भुजबळ, पडळकरांना? सत्तेच्या लालचींना! त्यामुळे हुंडा देणा-यांवर बहिष्कार हे सारे नाटक तर नाही ना? आधी ब्राह्मणशाही-पुरोहितशाही आणि भांडवलशाही हटवा. घर भरणी, निवडणुकीत फॉर्म भरताना मुहूर्त पाहाणे, लग्न, पूजा, आदी वेळेचे पुरोहित हाकला. मग हुंड्याचे पाहू. आधी कोपर्डी, वैष्णवी हत्याकांडांचे सलग काही वर्षे पाठपुरावा करा. त्या काळात आरक्षणाला जरा विश्रांती द्या. संघ-भाजपकडे जाणा-या मराठा आमदार-खासदारांचा बंदोबस्त करा. कोणत्याही पक्षाकडून गरीब मराठा तरुण निवडणुकीत निवडून येतील हे मिळून पाहू. आहे तयारी? वैष्णवीच्या लग्नातील सासर-माहेरचे दोन्ही बाप सारखेच दोषी आहेत. संपत्तीचा नंगानाच कमी होता म्हणून आता हयात नसलेल्या वैष्णवीच्याविरोधात शेवटचे हुकमी हत्त्यार उपसले गेलेय. तिच्या चारित्र्यावर संशय घेतले जात आहेत. जरी क्षणभर हे सारे व याही पेक्षा अधिक आरोप मान्य केले,तरी तिची हत्या कशी समर्थनीय ठरते? आणि या सा-यावर संघाचे स्मार्ट फडणवीस चूप कसे? त्यांची बडबडी, हुशार फडणवीस बाई आता गप्प कशा? इतक्यात भाजप खासदार किरण खेर बाईंनी तर अकलेचे खूपच तारे तोडल्याची बातमी फिरत आहे. त्या म्हणाल्याचे समजते, “सेक्स और बलात्कार हमारी संस्कृती का अहम हिस्सा है. वह खुले में हो या बंद कमरे में. हम इसे रोक नहीं सकते.” तरीही आजवर संघाची व त्याच्या परिवारातील जुने आणि चटावेले कॉंग्रेसी-राष्ट्रवादीवाले, काही शिवसेनेवाले यावर कहीही बोलणारच नाहीत हे ठाऊकच आहे. आणि संघ परिवारातील साधू-साध्वीही अशाच बोलत राहातात हेही ठाऊक आहे. आणि जगभर राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, कमालीची नैतिकता, सैनिकी शिस्त दाखवणारे संघाचे भागवत नेहमीप्रमाणे गप्पच? मोदींकडून तर अपेक्षाच नाही. चांगलं चाललंय संघ-भाजपचीच माणसं त्यांच्या पोटातील सत्य, तोंडाद्वारे ओकत आहेत. वैष्णवीवर सासरचे विविध आरोप करत सुटले आहेत. लग्नात ती खूश असल्याचे फोटो फिरवताहेत, हगवणे राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या सोबतच्या की काय कुणासोबत तरी सिनेमात पैसे गुंतवताहेत, अशीही बातमी फिरतेय. चहूकडून नवरीच्या आई-वडिलांना लूटताहेत आणि ते लुटूही देताहेत…कारण दुस-याचे धन-नकोशी मुलगी. मुलगी जन्मताच म्हणायचे, “पहिली बेटी, धनाची पेटी,”आणि मग म्हणत राहायचे “मुलगी दुस-याचे धन आहे,”….“तिला दुसरीकडे “नवरा-बैल बाजारात” खपवायचेच (विकायचे!)” असे करता करता, एकदा लग्न लावले की मुलगीची सासरी पाठवणी करताना, ती रडत असताना तिला सांगायचे, “बेटा, आता सासरी उभ्याने जा; आणि बाहेर येताना आडवी ये. (म्हणजे मेलेलीच ये! बाहेर तिरडीवरूनच ये!)” नाका-कानात कापसाचे बोळे घालून वैष्णवी बनूनच घराची चौकट ओलांडून ये.14:14स्त्रीविषयक अशी मनुस्मृतीची विषमतावादी, विकृत दृष्टी असली की, असे क्रूर वागणे येतेच. नुसते शालेय शिक्षण-उच्च शिक्षण, अफाट पैसा याचा आणि स्वातंत्र्य, समता, मैत्रिभावयुक्त दृष्टिकोनाचा काहीही संबंध नसतो. हे परत परत घडणा-या घटनांवरून दिसते. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जोतीराव फुले हे शिक्षणविषयक दृष्टिकोन सांगताना, प्रज्ञा, शील, करुणा, निती, निश्चित दिशा असलेला वेग म्हणजेच गति आणि शेवटी मग अर्थार्जन सांगतात. ते यासाठीच! आज हा आशय शिक्षणातून गायबच केला गेला आहे. केवळ पैसा आणि पैसा आणि पैसाच हे एकमेव उद्दिष्ट पुढे आणले गेलेय! यात थांबणे नाहीच. मग वैष्णवीसारख्या बहिणी आडव्या झालेल्या दिसणारच! बाबासाहेबांच्या न झालेल्या भाषणातील “नोशन्स” व त्यावर आधारित सारी प्रस्थापित व्यवस्था समजून कृतीची सुरुवात करण्यासाठी परत परत ते भाषण पारायणासारखे वाचायला पाहिजे. मुस्लिमविरोधी रा.स्व.संघवाले आणि त्यांची थिंक टॅंक अजून तरी केवळ बाबासाहेबांच्या “थॉट्स ऑन पाकिस्तान” मधील एखाद-दुसरे वाक्य मागचा पुढचा कोणताही संदर्भ न देता सोयीने सोशल मीडियातून फेकत असते. ते मागे पुढे जात (चातुर्वर्ण्य व्यवस्थाधिष्ठीत जात व्यवस्था नाही.) आम्ही कशी मानत नाही अशी लहान लेकरं समजून काहीही बोलू लागतात. त्या ब्राह्मणी चकव्याला सडेतोड उत्तर आपण ओबीसी-भटके विमुक्त, मुस्लीम आणि स्त्रियांनी प्रथम दिले पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकरवादी बौध्द, मातंगादी समूह यावर त्यांचे थोबाड लाल करतीलच. ब्राह्मणगाव, बावडा, गवई बंधूंचे डोळे काढणे …पुढे कसा आगडोंब उठला? कारण? तो आक्रमक मार्ग बरोबर की चूक नंतर पाहू. पण,नोशन्स आधारित ब्राह्मणी व्यवस्था उदध्वस्त करण्यासाठी त्यामागील मनामनातील संताप ही पहिली पूर्व अट आहे. बंड ही न्याय स्थापनेची सुरुवात असते. उलट, कॉंग्रेस गट आणि संघ परिवार अशी बंडं होवूच नये म्हणून घुसखोरी करतच राहाणार आहे! म्हणूनच व्यवस्था समर्थक राजकीय सत्तेविरुध्द स्री शुद्रातिशूद्रांना एल्गार पुकारावाच लागतो. म्हणूनच पल्लवी हगवणे/कस्पटे हत्येबाबत बोलावे लागत आहे, “मराठा मित्रांनो आधी कोपर्डीचे सांगा! मग बहिष्कार ठरावावर बोलू!….जयभिम!” शांताराम पंदेरे मोबा.: ९४२१६६१८५७


       
Tags: casecrimeKaspatemurderVaishnavi Hagavane
Previous Post

वंचित बहुजन युवा आघाडीची अकोल्यात युवतींसाठी पहिली शाखा सुरू

Next Post

भूमिहीन हक्क संरक्षण समितीची पुढील ऐतिहासिक भूमिका व दिशा ठरविणारे शिबीर

Next Post
भूमिहीन हक्क संरक्षण समितीची पुढील ऐतिहासिक भूमिका व दिशा ठरविणारे शिबीर

भूमिहीन हक्क संरक्षण समितीची पुढील ऐतिहासिक भूमिका व दिशा ठरविणारे शिबीर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धक्कादायक! आर. अश्विनने आयपीएलमधून घेतली निवृत्ती; परंतु ‘या’ लीग्समध्ये खेळत राहणार
क्रीडा

धक्कादायक! आर. अश्विनने आयपीएलमधून घेतली निवृत्ती; परंतु ‘या’ लीग्समध्ये खेळत राहणार

by mosami kewat
August 27, 2025
0

भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करून क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाब्बा कसोटीनंतर त्याने आंतरराष्ट्रीय...

Read moreDetails
नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश : कामगारांना दिलासा

नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश : कामगारांना दिलासा

August 27, 2025
वंचित बहुजन आघाडी पक्ष संघटन कळंब व उस्मानाबाद तालुका आढावा बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी पक्ष संघटन कळंब व उस्मानाबाद तालुका आढावा बैठक संपन्न!

August 27, 2025
पंजाबमधील जवाहर नवोदय विद्यालयात पूर, ४०० विद्यार्थी आणि ४० कर्मचारी अडकले

पंजाबमधील जवाहर नवोदय विद्यालयात पूर, ४०० विद्यार्थी आणि ४० कर्मचारी अडकले

August 27, 2025
‘रमाबाई अपार्टमेंट’ इमारत दुर्घटना: विरारमध्ये इमारत कोसळून 3 ठार, 20 ते 25 जण ढिगाऱ्याखाली

‘रमाबाई अपार्टमेंट’ इमारत दुर्घटना: विरारमध्ये इमारत कोसळून 3 ठार, 20 ते 25 जण ढिगाऱ्याखाली

August 27, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home