Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

खोपोली शहरात वंचित बहुजन आघाडीच्या शाखांचे उद्घाटन!; नागरिकांचा मोठा प्रतिसाद!

mosami kewat by mosami kewat
June 23, 2025
in बातमी, सामाजिक
0
खोपोली शहरात वंचित बहुजन आघाडीच्या शाखांचे उद्घाटन!; नागरिकांचा मोठा प्रतिसाद!
       
खोपोली : वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात शाखा स्थापनेचा झंजावात सुरू आहे. खोपोली शहरातील सम्राट अशोक नगर आणि वासरंग परिसरात शाखांचे नामफलक अनावरण करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड म्हणाले की, “गाव तिथे शाखा हे धोरण राबवत आम्ही संपूर्ण रायगड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची संघटना मजबूत करत आहोत. हा उपक्रम निवडणूकपुरता मर्यादित नसून, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.” आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ताकदीने लढणार आहे. शहराध्यक्ष सुमित जाधव यांनी यावेळी सांगितले की, “आगामी नगरपरिषद निवडणुकीत जास्तीत जास्त शाखा स्थापन करून पक्ष अधिक बळकट करू.

अधिक ताकतीने निवडणूक लढविणार आहोत.” महासचिव धर्मेंद्र मोरे यांनी तरुणांना आवाहन करत सांगितले की, “प्रस्थापित पक्षांच्या फसव्या आश्वासनांना बळी न पडता, तरुणांनी आपल्या भविष्याचा विचार करून वंचित बहुजन आघाडीत सामील व्हावे.” नवनिर्वाचित शाखाध्यक्ष अनुज राजगुरु यांनीही पक्षाविषयी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, “सध्याच्या राजकीय परिस्थितीत बाळासाहेब आंबेडकर वगळता तरुणांसाठी उपयोगी ठरतील असे कोणीही नेते उरलेले नाहीत.”

कार्यक्रमात महासचिव आशीष मणेर, कोषाध्यक्ष कुणाल पवार, संघटक संतोष मर्चंडे, उपाध्यक्ष अखिल शेख, ज्योती खाडे, प्रशाली मोरे, अमीना शेख, राहुल चव्हाण, शशिकांत कळवेकर, नयन गायकवाड, बंटी साळवी, राजेश गायकवाड यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. खोपोलीतून सुरू झालेली ही शाखा स्थापनेची चळवळ लवकरच संपूर्ण रायगड जिल्ह्यात पोहोचेल आणि पक्षाच्या विचारधारेचा प्रभाव अधिक व्यापक होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Tags: khopolisolapursujatambedkarvbaforindia
Previous Post

Election Commission : निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाही, जनतेच्या विरोधात – प्रकाश आंबेडकर

Next Post

Vanchit Bahujan Aghadi : 76 लाख मतांच्या रहस्यमय वाढीविरोधात सोलापूर येथे वंचितचा जनआक्रोश मोर्चा!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अजिंक्य भारत! वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक; इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडिया सहाव्यांदा ‘विश्वविजेती’
क्रीडा

अजिंक्य भारत! वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक; इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडिया सहाव्यांदा ‘विश्वविजेती’

by mosami kewat
February 6, 2026
0

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले कौतुक !  Under 19 World Cup 2026 : भारतीय युवा ब्रिगेडने पुन्हा एकदा दाखवून दिले...

Read moreDetails
अभिमानास्पद! भारताच्या मीराबाई चानूची विक्रमी खेळी, एकाच स्पर्धेत मोडले तब्बल तीन राष्ट्रीय विक्रम

अभिमानास्पद! भारताच्या मीराबाई चानूची विक्रमी खेळी, एकाच स्पर्धेत मोडले तब्बल तीन राष्ट्रीय विक्रम

February 6, 2026
Aurangabad : सुजात आंबेडकरांनी केली बिडकीन जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी

Aurangabad : सुजात आंबेडकरांनी केली बिडकीन जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी

February 6, 2026
अमरावतीत MIM ची भाजपला साथ – सोशल मीडियावर टीकेची झोड

अमरावतीत MIM ची भाजपला साथ – सोशल मीडियावर टीकेची झोड

February 6, 2026
स्वच्छ शहरांच्या मागची अस्वच्छ सामाजिक वस्तुस्थिती

स्वच्छ शहरांच्या मागची अस्वच्छ सामाजिक वस्तुस्थिती

February 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home