हिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या अरुंधतीताई शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन, बांधणी, विस्तार आणि निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा आणि स्थानिक पातळीवर पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचा संकल्प केला.
यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या अरुंधतीताई शिरसाठ, जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ कांबळे, जिल्हा महासचिव ज्योतिपाल रणवीर, जिल्हाकार्याध्यक्ष शिवाजीराव खरात, राजू इंगोले, महिला जिल्हाध्यक्ष प्रभावती खंदारे, कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे, कळमनुरी शहराध्यक्ष शकील पठाण,हिंगोली तालुका अध्यक्ष विनोद नाईक, औंढा तालुका अध्यक्ष सुनील मोरे,औंढा शहर अध्यक्ष अरविंद मुळे,मुकुंद करवंदे, राहुल करवंदे, आशिष खंदारे तसेच महिला पदाधिकारी अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; महिलांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
मुंबई : महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत पात्र महिलांना घरगुती वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने...
Read moreDetails