Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Nana Patole Alliance : नाना पटोलेंची भाजपसोबत असलेल्या शिंदेसेनेसोबत युती!

mosami kewat by mosami kewat
June 17, 2025
in बातमी, राजकीय, विशेष
0
नाना पटोलेंची भाजपसोबत असलेल्या शिंदेसेनेसोबत युती!

नाना पटोलेंची भाजपसोबत असलेल्या शिंदेसेनेसोबत युती!

       

काँग्रेस आधीपासूनच भाजपची बी टीम असल्याची सर्वत्र चर्चा

भंडारा : महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवणारी एक बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपसोबत असलेल्या शिंदेसेनेसोबत युती केली आहे.
शिवसेनेतील बंडानंतर गद्दार म्हणून टीका करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या आमदारासोबत काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी हातमिळवणी केल्याचं समोर आलं आहे.

राजकारणातील दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते राज्यातील राजकारणात नेहमी एकमेकांच्या विरोधात आहेत. त्या पक्षांच्या नेत्यांनी आज भंडारा येथे जिल्ह्यात दूध संघाच्या निवडणुकीसाठी एकत्र हातमिळवणी केली.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पूर्व विदर्भ समन्वयक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दूध संघाच्या निवडणुकीत हातमिळवणी केली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सोलापूरमधील बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेते आणि भाजप आमदार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं.

भंडाऱ्यातील (Bhandara) या युतीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही अशाच आघाडी व युती पाहायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

विशेषतः विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत देखील नाना पटोले यांची महाविकास आघाडीत देखील संशयास्पद भूमिका होती. त्यामुळे त्यांच्यावर टीका देखील झाली होती. आता दूध संघाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेसोबत युती करणाऱ्या नाना पटोले यांच्यामुळे आता भाजपची खरी बी टीम काँग्रेसच असल्याचे आता बोलले जात असून, अशीच परिस्थिती युती आणि आघाडी करताना काँग्रेसकडून होत राहिली तर भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकच आहेत. त्यामुळे त्यांना जनता आगामी निवडणुकांमध्ये त्यांना जागा दाखवून देईल, असेही आता बोलले जात आहे.


       
Tags: alliancebhandaraekanathshindeMaharashtramlananapatolepolitics
Previous Post

“भाजपची बी टीम कोण?” सुजात आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल!

Next Post

Pune Crime News : प्रेमसंबंधाचा भयंकर शेवट! मावळमध्ये रील स्टार महिलेने प्रियकराला संपवले

Next Post
Crime news: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या

Pune Crime News : प्रेमसंबंधाचा भयंकर शेवट! मावळमध्ये रील स्टार महिलेने प्रियकराला संपवले

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता - ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
July 16, 2026
0

नवी दिल्ली : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा...

Read moreDetails
Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

July 16, 2026
आर्थिक विषमता: देशाच्या दीर्घकालीन आरोग्याला लागलेली वाळवी

आर्थिक विषमता: देशाच्या दीर्घकालीन आरोग्याला लागलेली वाळवी

July 16, 2026
जात प्रमाणपत्रासाठी श्रीगोंदा तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार 'लाँग मार्च': ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा इशारा

जात प्रमाणपत्रासाठी श्रीगोंदा तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार ‘लाँग मार्च’: ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा इशारा

July 16, 2026
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांची मुदत वाढविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांची मुदत वाढविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home