Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

अभिनेता डिनो मोरियासह 8 जणांना ईडीचे समन्स, मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरण

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 8, 2025
in Uncategorized
0
अभिनेता डिनो मोरियासह 8 जणांना ईडीचे समन्स, मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरण
       

मुंंबई : सिनेअभिनेता डिनो मोरियासह एकूण 8 जणांना ईडीने समन्स बजावले आहेत. त्यामुळे मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी आता मोरियासह 8 जणांचे पाय खोलात आहेत. मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणात ६५ कोटींच्या कथित गैरव्यवहारात ईडीची कारवाई सुरू आहे. डिनो मोरियासह आठ जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.

या प्रकरणात ईडीने एकाच वेळी मुंबई, कोची आणि त्रिशूर येथील १८ ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये रोकड, बँक खाती, डिमॅट अकाउंट, डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. तर या प्रकरणी पालिकेच्या 3 अधिकार्‍यांसह 5 कंत्राटदार, 3 मध्यस्थ व 2 कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्ह्यानंतर आता ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार तपासाला वेग आला आहे. ईडीने महाराष्ट्रातील मुंबई तर केरळमधील कोची व त्रिशूर या ठिकाणी पाळंमुळं खोदण्यासाठी छापेमारी केली आहे.

मिठी नदी घोटाळा नक्की काय आहे?

मिठी नदीची साफसफाई व गाळ काढण्यासाठी सन 2021–22 आणि सन 2022–23 या कालावधीत मुंबई महानगरपालिकेने जवळपास 65 कोटी रुपये खर्च केले होते. मुंबईला महापूराचा धोका होऊ नये, मुंबईत पाणी साचू नये हा यामागील उद्देश होता. पण पुढे तपासात असे आले की, प्रत्यक्षात कोणतीही नाले, नदी सफाई करण्यात आली नाही. या सफाईसाठी बिल मिळवण्यासाठी बनावट अहवाल सादर करण्यात आले. ड्रेजिंग उपकरणे भाड्याने घेताना त्यात अनियमितता करण्यात आली. या सर्व प्रकरणात 65 कोटींचा मोठा घोटाळा झाल्याचा कथित आरोप आहे.


       
Tags: Maharashtra
Previous Post

अमेरिकेची कोको गॉफ फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची नवी विजेती

Next Post

शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्पपेपरची मागणी नियमबाह्य – चंद्रशेखर बावनकुळे

Next Post
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्पपेपरची मागणी नियमबाह्य – चंद्रशेखर बावनकुळे

शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्पपेपरची मागणी नियमबाह्य - चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !
बातमी

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

by mosami kewat
September 21, 2026
0

- संजीव चांदोरकर वित्त भांडवलाच्या युगात, स्थापनेनंतर फक्त २५ वर्षाच्या कालावधीत पूर्ण देशभर फूटप्रिंट असणारा भागभांडवलाचा पंथ (  इक्विटी कल्ट) ...

Read moreDetails
सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

September 21, 2026
आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

September 21, 2026
शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

September 21, 2026
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home