Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

देशात जातीय जनगणना सुरु होणार, तारीख जाहीर

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 6, 2025
in Uncategorized
0
देशात जातीय जनगणना सुरु होणार, तारीख जाहीर
       

पुणे – देशात जातीय जनगणना सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जातीय जनगणना १ मार्च २०२७ पासून सुरू होणार आहे. भारतात जातीय जनगणना २ टप्प्यात केली जाणार आहे. सुरुवातीला ४ राज्यांमध्ये जातीय जनगणना केली जाईल. त्यानंतर उर्वरित राज्यांमध्ये ही जनगणना दुसर्या टप्यात पार पडेल.

जातीय जनगणनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. 1 मार्च 2027 पासून जातीय जनगणना २ टप्प्यात केली जाणार आहे. प्रथम ४ राज्यांमध्ये जातीय जनगणना सुरू होईल. पहिल्या टप्प्यात जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये जात जनगणना केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जातीय जनगणना सुरू होणार आहे.

९४ वर्षांनंतर जातीय जनगणनेचा निर्णय

देशात सर्वप्रथम १९३१ साली जाती जनगणना इंग्रजांनी केली होती. त्यानंतर आज अखेर भारतात जातीय जनगणना झालेली नाही. मात्र आता तब्बल ९४ वर्षांनंतर, भारत सरकारने जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या जनगणनेत अनुसूचित जाती-जमातींच्या लोकसंख्येचा डेटा आहे, परंतु ओबीसींचा नाही, ज्यामुळे आरक्षण देताना अडचण निर्माण होते आहे.

जातीय जनगणना म्हणजे काय?

जातीय जनगणना ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये देशाच्या किंवा प्रदेशातील लोकसंख्येचे सर्वेक्षण करून विविध जाती आणि सामाजिक गटांची संख्या, सामाजिक-आर्थिक स्थिती आणि इतर माहिती गोळा केली जाते. याचा वापर देशातील विविध धोरणे आणि योजना राबविण्यासाठी केला जातो. यामुळे जनतेला मोठा फायदा होतो आणि सरकारलाही धोरणे आखण्यासाठी मदत मिळते.

जातीय जनगणनेचे फायदे काय आहेत?

जातीय जनगणना केल्याने राज्यात किंवा देशात कोणत्या समाजाचे किंवा जातीचे किती लोक आहेत याची माहिती मिळते. त्यानंतर सरकार त्यानुसार योजना बनवते. या जनगणनेमुळे मागासलेल्या समुदायांसाठी विशेष निधीची तरतूद करण्यास मदत होते, त्यामुळे त्यांची स्थिती सुधारण्यास मदत होते.


       
Tags: announcedbeginCastecensuscountrydateMaharashtraVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योजक एलॉन मस्क यांच्यात भांडण

Next Post

शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगडावर लाखो शिवभक्त दाखल

Next Post
शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगडावर लाखो शिवभक्त दाखल

शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगडावर लाखो शिवभक्त दाखल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात पावसाचा जोर घटणार; विदर्भात मात्र 'यलो अलर्ट' कायम!
Uncategorized

महाराष्ट्रात पावसाचा जोर घटणार; विदर्भात मात्र ‘यलो अलर्ट’ कायम!

by mosami kewat
July 29, 2025
0

महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मंगळवार, २९ जुलैपासून पावसाचा जोर कमी होणार असला, तरी पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर २९ व ३०...

Read moreDetails
देवघरमध्ये भीषण अपघात: १९ कावडियांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

देवघरमध्ये भीषण अपघात: १९ कावडियांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

July 29, 2025
मंगळवेढ्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारिणीसाठी मुलाखती; अनेक तरुणांचा पक्षात प्रवेश

मंगळवेढ्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारिणीसाठी मुलाखती; अनेक तरुणांचा पक्षात प्रवेश

July 29, 2025
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आरक्षणाशिवाय भरती, १० लाखांचा बॉन्ड अट; जाहिरात रद्द करण्याची वंचितची मागणी

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आरक्षणाशिवाय भरती, १० लाखांचा बॉन्ड अट; जाहिरात रद्द करण्याची वंचितची मागणी

July 28, 2025
दिव्या देशमुखने पटकावले FIDE महिला विश्वचषक २०२५ चे विजेतेपद!

दिव्या देशमुखने पटकावले FIDE महिला विश्वचषक २०२५ चे विजेतेपद!

July 28, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home