Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी तर्फे मोफत ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण 

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 12, 2021
in बातमी
1
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी तर्फे मोफत ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण 
       

नांदेड- कोवीड-१९  कोरोना व्हायरस प्रादुर्भावाने उद्भवलेल्या लॉकडाऊन परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी नांदेड शहर आणि जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी एकजुटीने एकवटली आहे. लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या व हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब मजूरदारांना अन्नदान तसेच उदरनिर्वाहासाठी अन्नधान्य वाटपाला मोठी गती देण्यात आली आहे. यापुढे जाऊन नांदेड शहर स्तरावर आगामी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर अत्यावश्यक रुग्णांसाठी आजपासून विनामूल्य ‘ऍम्ब्युलन्स’ सेवा आरंभिली आहे.

नांदेड येथे आज वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद व वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांच्या पुढाकाराने तसेच नांदेडच्या तहजीब फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या सौजन्याने वंचितच्‍या या मोफत ऍम्ब्युलन्स सेवेची सुरुवात करण्यात आली. पूज्य भदंत पैंया बोधी आणि मौलाना अजीम रजवी सहाब यांच्या हस्ते मोफत ॲम्बुलन्स सेवेचे लोकार्पण करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानंतर नांदेड येथे वंचित बहुजन जिल्हा आघाडीतर्फे मदत कक्ष उभारण्यात आला आहे. नांदेड शहर, जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेर लॉकडाऊन मध्ये सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यात येत आहे.

नांदेड शहरात विविध ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे भोजन डबा पोहोचविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सकाळ संध्याकाळ दोन वेळा मोफत भोजनाची व्यवस्था पुरविण्यात आली आहे. लॉकडाऊन आदेशाला उणेपुरे दोन आठवड्यांचा कालावधी होत असल्याने नांदेड शहरात हातावर पोट असणाऱ्या मोलमजुरी करणारे गोरगरीब, कामगार- कष्टकऱ्यांची मोठी बिकट अवस्था झाली आहे. बहुतेक झोपडपट्टी परिसरात मोठ्या संख्येने राहणाऱ्या गोरगरीबांच्या चुली बंद पडत आल्या आहेत. अशा गरजू लोकांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अन्नधान्य पाकिटे घरपोच पुरवण्यात येत आहेत. ज्यामध्ये गहू-तांदूळ, डाळ, साखर , तेल आदी अत्यावशक वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय नांदेड शहरात विविध रस्त्यांवर वावरणाऱ्या बेवारस व भिक्षेकरी यांच्यासाठीसुद्धा खिचडी तसेच पाणी वाटपावर वंचित आघाडी तर्फे भर देण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूख अहमद, जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आयुब खान, उपाध्यक्ष अशोक कापशीकर, कनिष्क सोनसळे, संम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष संदीप वन्ने, उन्मेश ढवळे, सचिन नवघडे, सोपान वाघमारे, गणेश सूर्यवंशी आदी यासाठी परिश्रम घेत आहे.


       
Tags: कोरोनामोफत ऍम्ब्युलन्सलॉकडाऊनलोकार्पणवंचित बहुजन आघाडी
Previous Post

घराणेशाहीतील तरुण नेतृत्वाला संधी हवीच पण… वंचित बहुजनांचे काय?

Next Post

लॉकडाऊन : औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडीची हेल्पलाईन 

Next Post
लॉकडाऊन : औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडीची हेल्पलाईन 

लॉकडाऊन : औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडीची हेल्पलाईन 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home