ॲड. प्रकाश आंबेडकर : पोलिसांच्या मारहाणीत झाला मृत्यू
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या जबर मारहाणीत झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका दैनिकातील बातमीचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. तसेच दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी माहिती देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली. घाटी येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या मणक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाला, असे म्हटले आहे.
ज्या पोलिसांनी सोमनाथला मारहाण केली, त्यांच्यावर मनुष्यवधाचा ३०२चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुख्यमंत्री सभागृहात जाहीरपणे खोटे बोलत असतील तर राज्याचे काय? असा सवालही ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.