अकोला : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा महिला प्रदेश महासचिव अरूंधतीताई शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत व महिला महानगर अध्यक्षा वंदनाताई वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली महिला व युवतींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
वंचित बहुजन महिला आघाडी अकोला महानगराच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त महिला व युवतींसाठी १) ह लोककला २) गायन स्पर्धा ३) संगीत खुर्ची ४) टिकली स्पर्धा यांसह विविध स्पर्धांचे आयोजन स्थानिक सम्यंक संबोधी भवन रणपिसे नगर अकोला येथे आज र दि. ०८ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा महिला प्रदेश महासचिव अरूंधतीताई शिरसाट, जि. प. अध्यक्ष संगीताताई अढावू, माजी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, भारतीय बौद्ध महासभेच्या महिला जिल्हाध्यक्षा इंदूताई मेश्राम, माजी जिल्हा महासचिव शोभाताई शेळके, महानगर महासचिव प्रा. मंतोषताई मोहोळ, महानगर महासचिव सुवर्णाताई जाधव, महानगर महासचिव ज्योतीताई खिल्लारे, किरणताई बोराखडे, स्मिताताई डोंगरे, मिनलताई मेंढे, सुनिताताई गजघाटे, मायाताई इंगळे, सरलाताई मेश्राम, सरोजताई वाकोडे, पुष्पलताताई पांडे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुवर्णा जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. मंतोषताई मोहोळ यांनी केले.