मुंबई :वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली. कल्याण लोकसभा मतदारसंघातून जमील अहमद, मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून संतोष अंबुलगे आणि मुंबई दक्षिण मतदारसंघातून अफझल दाऊदानी यांना उमेदवारी देण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने सांगली लोकसभा(44) मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती.
अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व मिळावे या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीने 6 अल्पसंख्यांक उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहेत. महाविकास आघाडी किंवा महायुती मधील एकाही पक्षाने मुस्लीम उमेदवार दिला नाही. त्यामुळे राज्यातील अल्पसंख्यांक वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने असल्याचे दिसते.