मुंबई : वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची नववी यादी जाहीर झाली असून, पक्षाच्या एक्स हॅंडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. यात जळगाव मतदारसंघातून युवराज जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर नाशिकमधून करण गायकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
याआधी जळगावमधून प्रफुल्ल कुमार रायचंद लोढा यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने जळगाव मतदारसंघातून प्रफुल्ल कुमार रायचंद लोढा यांच्या जागी युवराज भीमराव जाधव यांच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे.
तसेच, नाशिकमधून वंचित बहुजन आघाडी कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज नाशिकमधून करण गायकर यांना उमेदवारी दिल्याने येथे जोरदार लढत होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.