मतदान करण्यासाठी सहकार्य हवे असल्यास संपर्क साधा
अकोला : सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, सर्वच ठिकाणी निवडणुकांचीच चर्चा आहे. फक्त चर्चाच नाही भारताची लोकशाही टिकवण्यासाठी मत देणंही आवश्यक आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पक्षाच्या एक्स हॅंडलवरुन अकोल्यातील मतदारांना आवाहन केले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, अकोला लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना अकोल्यात मतदान करण्यासाठी काही सहकार्य हवे असल्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, सुजात यांनी म्हटले आहे की,” 26 जानेवारी 2025 मध्ये संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आवाज संसदेत हवा आहे”.
पक्षाच्या एक्स हॅंडलवर काही मोबाईल क्रमांक दिले असून, यामध्ये महाराष्ट्र आणि दुसऱ्या राज्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा क्रमांक दिला आहे. यामध्ये आनंद जाधव ― (मुंबई) – 9860906171, महेन्द्र अनभोरे ― (ठाणे शहर जिल्हा) 8097356500, मोहन नाईक ― 8369064775, रवी कांबळे ― 9766464969, वैशाली खंडागळे (बदलापूर, जि. ठाणे) ― 7030566525, शेषराव वाघमारे (उल्हासनगर) – 9323036791, ॲड. अरविंद तायडे (पुणे) – 98503 26438, संजय ठोंबे (पिंपरी चिंचवड) – 9922440293, संजीवन कांबळे – 9860906171, नाना मोरे – 8605101785, बंटी काळे (नाशिक) – 7020554839 आणि विनोद दांडगे (सुरत, गुजरात) – 9327617661 यांचा समावेश आहे. त्यामुळे मतदान करण्यासाठी काही अडचण येत असल्यास, या क्रमांकावर संपर्क साधून अकोल्यातील मतदारांना मदत मिळवता येणार आहे.