वंचित बहुजन आघाडीचा काँगेसवर हल्लाबोल
मुंबई : काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात CAA – NRC बाबत कोणताही उल्लेख नाही. UAPA कायदा ज्याचा वापर निष्पाप मुस्लिमांवर, आदिवासींवर आणि दलितांवर केला जातो, त्याबाबत कोणताही उल्लेख नाही. काँगेसनेच UAPA कायदा आणला होता असा आरोप करीत काँग्रेसचे नकली आणि खोटे मुस्लिम प्रेम असल्याचा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसकडून एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही याकडे वंचित बहुजन आघाडीने लक्ष वेधले आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात एकाला उमेदवारी दिली आहे, ज्याचा आरएसएस आणि मुस्लीम विरोधकांसोबत मजबूत नाते आहे आणि यामुळे काँग्रेस बेवफा असल्याचे यात म्हटले आहे.