औरंगाबाद : औरंगाबाद येथील वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयात काँग्रेस नेते, औरंगाबाद मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अफसर खान यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वावर विश्वास ठेऊन, वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
या प्रसंगी युवा जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड, पश्चिम शहर अध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पी. के. दाभाडे, प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, मराठवाडा सचिव तय्यब जफर, पूर्व शहराध्यक्ष मतीन पटेल, माजी नगरसेवक जावेद कुरेशी, पूर्व युवा शहराध्यक्ष अफसर पठाण, मंगेश निकम, रवि रत्नपारखे, सुभाष कांबळे, सागर थोडपकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.