Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘वंचित’ने पाणी पुरवठा समस्या सोडविण्यासाठी दिली रिकामी घागर भेट

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 1, 2024
in बातमी
0
‘वंचित’ने पाणी पुरवठा समस्या सोडविण्यासाठी दिली रिकामी घागर भेट
       

यवतमाळ: यवतमाळ शहरात होणारा वेळी अवेळी अनियमितता पाणी पुरवठा,आणि इतर समस्या सोडविण्या करिता वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण यवतमाळ यांना पाण्याच्या घागरीवरच समस्या लिहून रिकामी घागर भेट दिली.

कार्यकारी अभियंता यांचा कक्षात जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून, मागणी केली की, यवतमाळ शहराची तहान भागवणाऱ्या धरणात मुबलक असणारा पाणीसाठा, बेंबळा धरणावरून अमृत योजनेतून होणारा पाणी पुरवठा इत्यादी मुबलक पाणी स्रोत असून सुद्धा, फक्त अधिकाऱ्यांच्या बेपर्वा आणि ढिसाळ नियोजणामुळे शहरात रात्री बेरात्री अनियमितता पाणी, पुरवठा होत आहे, महिलांना,नागरिकांना नळाला पाणी येण्याची वाट पाहत ताटकळत बसावे लागते त्यामुळे रोज ठराविक वेळेनुसार स्वच्छ आणि जंतू विरहित नियमित पाणी पुरवठा करावा, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी, इत्यादी समस्या पाण्याच्या घागरीवर लिहूनच कार्यकारी अभियंता यांना प्रतिकात्मक भेट देण्यात आली. सर्व समस्या तातडीने निवारण करण्याची विनंतीही करण्यात आली. अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला.कार्यकारी अभियंता यांनी सर्व समस्या तातडीने सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले.

यावेळी वंचित चे जिल्हा अध्यक्ष डॉ.निरज वाघमारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष धम्मवती वासनिक, जिल्हा महासचिव शिवदास कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष आकाश वाणी, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण कपिले, महिला महासचिव पुष्पा सिरसाट, सरला चचाने महिला उपाध्यक्ष वंदना उरकुडे, मीना रणीत, सचिव भारती सावते, शहराध्यक्ष कुंदन नगराळे, शहर महासचिव विलास वाघमारे, शैलेश भानवे कोषाध्यक्ष उत्तमराव कांबळे शहराध्यक्ष करुणा चौधरी, शहर महासचिव रत्नमाला कांबळे, शिला वैद्य, शोभना कोटंबे, सुकेशिनी खोब्रागडे, आनंद भगत, प्रसेंजित भवरे, सुनील वाघमारे, कल्पना सिरसाट, निशा निमकर,निलेश स्थूल सुधाकर वासनिक, देवानंद कांबळे, प्रवीण करमणकर, संदीप हरणे सतीश कांबळे, सुमती खंडारे, माया मस्के, प्रज्ञा देशभ्रतार, शालू खोब्रागडे,सरिता भोवते सुरेश खंडारे, रेखा मोहोड,पौर्णिमा गजभिये, पूजा राऊत,यांसोबतच वंचित चे शेकडो कार्यकरता उपस्थित होते.


       
Tags: MaharashtraVanchit Bahujan AaghadiYavatmal
Previous Post

‘वंचित’ ने दिलेली यादी ‘मविआ’ त येण्याआधीची

Next Post

साहेब कोलाट्याच्या पोराला गृहमंत्री करा – ॲड.डॉ. अरुण जाधव

Next Post
साहेब कोलाट्याच्या पोराला गृहमंत्री करा  – ॲड.डॉ. अरुण जाधव

साहेब कोलाट्याच्या पोराला गृहमंत्री करा - ॲड.डॉ. अरुण जाधव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
२३ मार्चला नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाजवळ धरणे; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा
बातमी

२३ मार्चला नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाजवळ धरणे; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

by mosami kewat
March 11, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाशआंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका करत २३ मार्च रोजी नागपूर...

Read moreDetails
ऊर्जा सुरक्षेकडे दुर्लक्ष देशाला महागात पडणार

ऊर्जा सुरक्षेकडे दुर्लक्ष देशाला महागात पडणार

March 11, 2026
Aurangabad Protest : मोदी हटाव, देश बचाव! औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Aurangabad Protest : मोदी हटाव, देश बचाव! औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक

March 11, 2026
इंस्टाग्राम डाऊन! फीड आणि मेसेजिंगमध्ये अडचणी; सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

इंस्टाग्राम डाऊन! फीड आणि मेसेजिंगमध्ये अडचणी; सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

March 11, 2026
पेट्रोलियम क्षेत्रात ESMA लागू; केंद्र सरकारच्या धोरणावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका!

पेट्रोलियम क्षेत्रात ESMA लागू; केंद्र सरकारच्या धोरणावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका!

March 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home