ओबीसी बांधवांसह हजारो नागरिकांची तुफान गर्दी !
.वर्धा : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वर्धा येथील बोरगाव मेघे क्रिकेट मैदान गणेश नगर येथे आज महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या महासभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर संबोधित करणार आहेत. या सभेपूर्वीच मैदानावर नागरिकांची तुफान गर्दी झाली आहे. या सभेत बाळासाहेब आंबेडकर काय बोलणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.
मी पारधी, मी ख्रिश्चन, मी इसाई, मी पारशी, मी मुस्लीम, मी होलार, मी लोहार, मी मतदार, मी शिकलगार, मी जैन, मी शीख, मी हिंदू, मी हटकर, मी धोबी, मी गवंडी इत्यादी जात समुहांच्या नागरिकांनी वर्ध्यातील महासभेला उपस्थिती लावली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या सभा राज्यातील अनेक जिल्ह्यात होत आहेत. या सभांना लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहत आहेत. मुंबई, नागपूर, सांगली, बीड, अमरावती, जळगाव, नाशिक याठिकाणी वंचितच्या रेकॉर्ड ब्रेक सभा झाल्या आहेत. ओबीसी, गरीब मराठा, मुस्लीम, दलित, आदिवासी आणि राज्यातील वंचित समुहांनी मोठ्या प्रमाणात सभांना हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे ॲड.प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वावर राज्यातील जनतेच्या विश्वास असल्याचे चित्र सध्या त्यांच्या सभांना मिळत असलेल्या प्रतिसादावरून दिसत आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्याचे चित्र नक्की बदलणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पुण्यातील सभेचीही उत्सुकता –
पुण्यात देखील 27 फेब्रुवारी रोजी बाळासाहेब आंबेडकर यांची सत्ता परिवर्तन महासभा होणार आहे. या सभेअधीच पुण्यात म्हाविकास आघाडीची सभा होणार असल्याने बाळासाहेब आंबेडकर काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन होण्याची दाट शक्यता असून वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीत सहभागी झाल्यास राज्यात आणि देशातही सत्ता परिवर्तन अटळ असल्याचे बोलले जात असून या सभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.