Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

‘वंचित’ च्या बोंबाबोंब आंदोलनमुळे मागण्या पूर्ण झाल्या – ॲड.डॉ.अरुण जाधव

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 17, 2024
in राजकीय
0
‘वंचित’ च्या बोंबाबोंब आंदोलनमुळे मागण्या पूर्ण झाल्या – ॲड.डॉ.अरुण जाधव
       
जामखेड : जामखेड तहसील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. जामखेड तालुका येथील खर्डा गावातील पीर देवस्थान मंदिराचे डागडुजी होणे बाबत तसेच खर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनेगाव प्राथमिक उपआरोग्य केंद्र व शिऊर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मध्ये तातडीने डॉक्टर उपलब्ध करून सुविधा देऊन चालू करणे तसेच दिघोळ ते खर्डा रस्त्याचे मजबूतीकरण होणे यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये डिगोळ ते खर्डा जो रस्त्याचे काम अधुरे राहिले आहे ते आठ दिवसांमध्ये चालू करून पूर्ण पण होईल, असे लेखी पत्र तहसीलदार साहेब यांनी दिले. खर्डा कानिफनाथ पीर देवस्थान पडझड झालेली आहे. ती येणाऱ्या यात्रा पर्यंत काम पूर्ण होईल, तसेच खर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र एका महिन्यामध्ये उद्घाटन करून तिथल्या सुविधा पूर्ण होतील अशी लिखित पत्र दिले. जामखेडचे नायब तहसीलदार साहेब भोसेकर यांनी लिखित पत्र दिले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे भटके विमुक्त आदिवासी आघाडी राज्य समन्वयक ॲड.अरुण जाधव म्हणाले की, निवेदनात दिलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्या संदर्भात लिखित स्वरूपामध्ये पत्र दिले आहे त्यामुळे तातडीने काम पूर्ण करावे. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील काळामध्ये या विषयाला घेऊन व्यापक आंदोलन करण्याचा इशारा दिला.

यावेळी लोकअधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते बापू ओहोळ, सामाजिक कार्यकर्त्या उमाताई जाधव, लोकाधिकार आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल पवार, लोकअधिकार आंदोलन संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष द्वारका पवार, वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक नंदकुमार गाडे, वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुका अध्यक्ष आतिश पारवे त्याचबरोबर वैजिनाथ केसकर ,भीमराव सुरवसे ,राजू शिंदे, रजनी आवटे,ऋषिकेश गायकवाड,शहानुर काळे,आलेस शिंदे,सुनील काळे,मोहम्मद मुजावर शेकचंद,मुजावर मुबारक, मुजावर बाबा,मुजावर नजीब, मुजावर हमीद भाई,मुजावर इब्राहम,मुजावर निजाम,मुजावर खलील, मुजावर इस्माईल, मुजावर मन्सूर,सलीम मदारी, मुस्तफा मदारी,फकीर मदारी हुसेन मदारी,जावीद मदारी, मोहम्मद मदारी, असलम मदारी, आबा साळवे,तालुका अध्यक्ष आतिश पारवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Arun JadhavjamkhedVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ठाण्यातील विद्यार्थ्यांचा ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ मध्ये प्रवेश !

Next Post

रस्ता रुंदीकरण मध्ये गेलेल्या अतिक्रमण धारक कुटुंबांना पर्यायी जागा व मोबदला मिळावा.

Next Post
रस्ता रुंदीकरण मध्ये गेलेल्या अतिक्रमण धारक कुटुंबांना पर्यायी जागा व मोबदला मिळावा.

रस्ता रुंदीकरण मध्ये गेलेल्या अतिक्रमण धारक कुटुंबांना पर्यायी जागा व मोबदला मिळावा.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ – सुजात आंबेडकर
बातमी

वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ – सुजात आंबेडकर

by mosami kewat
September 15, 2026
0

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांशी तातडीने संपर्क साधण्याची मागणी! मुंबई : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील दलित, आदिवासी...

Read moreDetails
प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा

प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा

September 15, 2026
चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला बळ; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला बळ; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

September 15, 2026
हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

September 15, 2026
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home