मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारला कृषी धोरण राबविण्याविषयी सूचना केल्या आहेत. यात त्यांनी सांगितले आहे की,
१. चालू हंगामात MSP मध्ये वाढ करण्यात यावी.
२. MSP ची सक्तीने अंमलबजावणी करणे.
३. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि बोनससाठी किंमत स्थैर्य निधी आणि भांडवल निर्मिती निधी उभारणे.
४. कमी मागणीच्या काळात किंमती नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून माल विकत घ्यावा.
शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी धोरण राबविण्याऐवजी आणि कायदेशीर उपाययोजना करण्याऐवजी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ निवडणुकीची भाषणबाजी करण्यात धन्यता मानत असल्याची टीकाही त्यांनी केली.
या अपराध्यांना कोणत्या कायद्याखाली अटक करणार? तुमच्या भाषणबाजीपेक्षा शेतकऱ्यांना दीर्घकालीन उपाय योजनांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.