कोल्हापूर: कोल्हापूर येथील लक्षदुत वसाहतीच्या अनधिकृत बांधकाम हटवण्यावरून जे प्रकरण घडलं यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते, इम्तियाज नदाफ यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणात ज्या मुस्लीम लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये किंवा या विषयाला वेगळे वळण लागू नये, म्हणून हे गुन्हे तूर्तास मागे घेऊन हा विषय संपला आहे असे जाहीर करण्याची विनंती प्रशासनाला केली आहे.
या प्रकरणात मुस्लीम समाजाने सरतेशेवटी स्वतःहून बांधकाम हटवण्याची भूमिका घेतली आणि ती हटवण्यापूर्वी तीन वेळा प्रशासन तिथे गेले. पोलिसांनी थांबण्याचा निर्णय घेतला किंवा मुस्लीम समाजाने त्यांना परत माघारी पाठवलं हा जो घटनाक्रम घडला यातून हे उन्नीस बीस झाले असेल, ते प्रकरण ज्यावेळी संपलं असे वाटत असताना प्रशासनाकडून 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे, ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे त्यांचे अटकसत्र सुरू होणार असल्याच्या चर्चा बाहेर येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये किंवा या प्रकरणाला वेगळे वळण लागू नये, म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांनी प्रशासनाला गुन्हे मागे घेण्याची आणि हे प्रकरण संपवण्याची विनंती केली.