पुणे : मोदी तुमच्या श्रीमंत मित्रांना अजून श्रीमंत करणं, मातृभूमीच्या सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे का? असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
खाजगी कंपन्यांची कार्यालये आणि गुंतवणुकी विविध देशात असतात. सुरक्षा संशोधन आणि DRDO ची दारं खाजगी कंपन्यांसाठी खुली करणं म्हणजे, देशाची सुरक्षा विकण्यासारखे आहे.मोदी हे करणार असतील तर देशाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. असेही ॲड आंबेडकरांनी म्हटले आहे.
सरकारचे माजी प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजय राघवन यांच्या अध्यक्षतेखाली भविष्यातील युद्धासाठी आत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने DRDO मध्ये सुधारणा करण्यासाठी उच्चाधिकार समितीने आपला अहवाल सादर केला आहे. यानुसार DRDO मध्ये खाजगी कंपन्यांचे सहाय्य घेण्याची तरतूद केली असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे. मात्र अद्याप सरकारने या अहवालाबाबत गुप्तता पाळली आहे. या पार्श्वभूमीवर हे ट्विट त्यांनी केले आहे.