अकोला: तलाठी भरती परीक्षेतील गोंधळामुळे अकोल्यात प्रा. विठ्ठल कांगणे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या, अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते, सुजात आंबेडकर यांची अकोल्यातील आंबेडकरांच्या यशवंत भवन येथे भेट घेतली. यावेळी तलाठी भरती परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणी आंदोलन करण्याची गरज आहे यावर चर्चा झाली. अजून माहिती घेऊन याचे धागे दोरे शोधुन परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिली.
वनरक्षक परीक्षेत १२० पैकी ५४ गुण, तलाठी परीक्षेत २१४.५६ गुण तर हे मार्क्स एकाच विद्यार्थ्याचे आहेत. एका ठिकाणी ४५ टक्के कसेबसे पडले असताना दुसऱ्या परीक्षेत गुणांचा उच्चांक मोडीत काढला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
नोर्मलायझेशनमुळे कोणाचे १० मार्क्स वाढले आहेत, तर कोणाचे ५० तर, कोणाचे ८० मार्क्स वाढले आहेत. हे मार्क्स वाढण्यासाठी कशाचा आधार घेतला असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तलाठी भरती परीक्षा देत असताना सेंटर मॅनेजर आहेत जेवढे मेरिट मध्ये आहेत त्यांचे सीसीटिव्ही फुटेज आणि लॉग इन आयडी. ऑपरेट कसे झाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जिथं जिथं आर्थिक व्यवहार केले तिथं नोर्मलायझेशन गुण २०० मार्काचा पेपर असताना २१४, २८०, २०१ असा बोगस कारभार केल्याचा आरोप त्यांनी केला. याविरुद्ध आता एल्लगार होणार असा ईशाराही त्यांनी दिला.