पुणे : सरसकट ७६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप बार्टी प्रशासनाकडून मंजूर करून घेण्यात वंचित बहुजन युवा आघडीला यश आले आहे. आर्थिक बजेट करीता सकारात्मक प्रस्ताव देखील बार्टीच्या वतीने शासनास पाठविण्यात आला.वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्याचे महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात बार्टीच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
मागील शंभर दिवसांहून अधिक दिवस बार्टी फेलोशीप मिळावी म्हणून विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. मात्र त्यांना कसलाही प्रतिसाद बार्टी प्रशासनाकडून मिळत नव्हता या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी पोलीस प्रशासनाची दादागिरी देखील येथे पाहण्यात आली. पत्र देऊन आणि परवानगी घेऊन आंदोलन करण्यात आले असतानाही पोलिसांनी युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कलम १४४ लागू आहे काय? परवानगी घेऊन हे आंदोलन सुरू असताना तुम्ही असे वर्तन कसं करू शकता असा सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांना केला.
यावेळी राज्य कार्यकारी सदस्य पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश नांगरेपाटील ,राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल गवळी,राज्य कार्यकारिणी सदस्य ॲड.अफरोज मुल्ला , तसेच वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार जनरल युनियन, सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर ,पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड सर्व अध्यक्ष तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.