पुणे : आपण कुठल्याही क्षेत्राशी निगडित असाल आणि कुठल्याही पदावर काम करत असाल तरीही आजच्या काळात तुम्ही सोशल मीडियाचा वापर टाळून तुमच्या क्षेत्रात प्रगती करू शकत नाही. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करता येणे ही आज अर आवश्यक गोष्ट झाली आहे. त्यामुळेच प्रबुद्ध भारतच्या वतीने आपल्यासाठी २ दिवसीय “सोशल मिडिया इन्फ्ल्यून्सर वर्कशॉप” आयोजित केले आहे. हे वर्कशॉप पुणे किंवा नाशिक भागात होईल.
या कार्यशाळेमध्ये आपण सोशल मिडियाचा प्रभावी वापर कसा करावा, सोशल मीडियाद्वारे आपले करियर नव्या उंचीवर कसे घेऊन जावे, उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी सोशल मीडियाचा वापर कसा करावा, सोशल मीडिया हा एक करियर ऑप्शन म्हणून कसा वापरावा या बद्दल सखोल प्रशिक्षण देणार आहोत. समाज माध्यमांवरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर व्यक्त होणे, सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर कसे व्हावे, युट्युबर, डिजिटल क्रिएटर, कंटेट रायटींग याकडे करियरची वाट म्हणून बघितली जाते. करिअरच्या या वाटेवर यशस्वी युट्युबर, डिजिटल क्रिएटर होण्याची, नवी गोष्टी शिकण्याची इच्छा असणा-या सर्व तरुण-तरुणींनी करायलाच हवी अशी ही अनोखी कार्यशाळा असणार आहे.
ही कार्यशाळा ऑनलाईन / ऑफलाईन स्वरूपात होईल.
कार्यशाळेमध्ये काय मिळेल ?
१. सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर कसे व्हावे?
२. कंटेंट निर्मितीचे माध्यम, गमक आणि सर्जनशीलता
३. सोशल मीडियाचे बदलत जाणारे वेगवेगळे फॉर्म्स
४. आपला टार्गेट ऑडीयन्स कसा ओळखावा. नवीन ऑडीयन्सकडे कसे पोहचावे.
५. सोशल मीडियावर फॉलोअर्स कसे वाढवावे.
६. कंटेंट निर्मितीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
७. Artificial Intelligence आणि सोशल मीडिया
८. समाजमाध्यमांतून आर्थिक सोर्स कसा उभारावा.
९. या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तिंचे मार्गदर्शन.
या वर्कशॉपसाठी ज्यांनी फॉर्म दाखल केले आहेत त्यांना वर्कशॉपच्या एक आठवडा आधी कळविण्यात येईल.