मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २५ नोव्हेंबर रोजी छ. शिवाजी महाराज पार्क मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान सन्मान सभेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी जनतेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी ते म्हणाले की, येत्या २५ तारखेला आपली शक्ती दाखवण्यासाठी, आपण भारतीय संविधानाच्या सोबत उभे आहोत हे दाखवण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा.
‘संविधान के सन्मान में’ हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. निवडणुकांचा माहोल आहे. संविधानाच्या विरुद्ध काम करणारे लोक सत्तेवर बसले आहेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी, आपले हक्क आणि अधिकार वाचवण्यासाठी आपण आपली एकजूट दाखवणार आहोत. ही लढाई अखेरची असल्याने आपले हक्क आणि अधिकार वाचवण्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सहभागी व्हा. असेही त्यांनी म्हटले आहे.