आज बुधवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री निलेश भैय्या विश्वकर्मा व महासचिव श्री राजेन्द्र दादा पातोडे यांच्या सूचनेनुसार पुणे शहर युवा अध्यक्ष श्री परेश शंकरराव शिरसंगे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यात सरळसेवेने तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी नेमणूक करीता आयोजित ऑनलाईन स्पर्धा परीक्षांसाठी मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल आणि अनाथ ह्यांची आर्थिक पिळवणूक बंद करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनालीत मागण्या खालीलप्रमाणे,
1) पदभरती परिक्षा शुल्क रुपये १००/- पेक्षा जास्त नसावी.
2) काही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित अथवा रद्द झाल्यास परिक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळावे.
3) जात पडताळणी / वैधता प्रमाणपत्र सरसकट सगळ्या परीक्षार्थीना न मागता, केवळ पदभरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांनाच मागावा.
सदर निवेदन आरडीसी ज्योती कदम यांना देऊन, राज्य सरकार तर्फे आयोजित पदभरती प्रक्रिया वरील मागणीनुसारच राबविण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच संवैधानिक तरतुदी पायदळी तुडवून पदभरती प्रक्रिया सुरु केल्या बद्दल पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी युवा आघाडी राज्य सदस्य श्री रूषिकेशजी नांगरे पाटील, श्री म.ना.कांबळे सर, महिला आघाडी अध्यक्षा सौ अनिताताई चव्हाण, महासचिव ॲड अरविंद जी तायडे, युवा महासचिव शुभमजी चव्हाण, ओमकार कांबळे, अक्षय तायडे,रफिक शेख, जाॅर्ज मदनकर, पितांबर धिवार,वडगाव शेरी अध्यक्ष विवेकजी लोंढे, खडकवासला महासचिव मधुकर दुपारगुडे, सचिन कलाधर, प्रतिभा कांबळे, कविता चाबुकस्वार, राजेंद्र कांबळे, गोपाळ वाघमारे, राहूल अवचिते व कार्यकर्ते उपस्थित होते.