Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वाढती महागाई तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीची कोल्हापूरात भव्य पदयात्रा

प्रबुद्ध भारत by प्रबुद्ध भारत
May 1, 2023
in बातमी
0
वाढती महागाई तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीची कोल्हापूरात भव्य पदयात्रा
       

कोल्हापूर. दि ०१ मे २०२३ : बिंदू चौकात सुरु झालेली ही पदयात्रा शिवाजी रस्ता मार्गे शिवाजी चौक तिथून भाऊसिंगजी रस्त्याने महानगरपालिका मार्गे सीपीआर चौकात येऊन राजर्षी छत्रपती शाहु समाधी स्थळावर तिची सांगता झाली.वाढती महागाई , बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीची कोल्हापूरात भव्य पदयात्रा काढण्यात आली होती .

या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शाहु महाराजांचा विजय असो, छत्रपती शाहु महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परीसर दणाणून सोडला.

ही पदयात्रा शाहुमहाराज समाधी स्मारकावर पोहचण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांनी भाऊसिंगजी रस्त्यावर ज्या ठिकाणी छत्रपती राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून दिले त्या ऐतिहासिक ठिकाणी भेट दिली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळावर राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून या सांगता करण्यात आली. राज्य सरकार चुकीची धोरणे राबवून संविधान धोक्यात आणण्याचे काम करत आहे. जो काही छुपा अजेंडा राज्य सरकार राबवत आहे तो जनतेसमोर यावा अशी मागणी कोल्हापूरच्या प्रभारी डॉक्टर क्रांतीताई सावंत यांनी यावेळी केली.

राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन महागाई कमी करावी. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात यैईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूरचे निरीक्षक अतुल बहुले यांनी दिला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलींद पवार, पदयात्रेचे नेत्रुत्व डॅा. क्रांतीताई सावंत यांनी केले यावेळी कोल्हापूरचे निरीक्षक अतुल बहुले यावेळी उपस्थित होते .

कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा उत्साहात पडला पार


कोल्हापूरात भव्य पदयात्रा झाल्यानंतर राजश्री शाहू स्मारक येथे कोल्हापूर येथे जिल्हा अध्यक्ष ,युवक अध्यक्ष ,महीला आघाडी ,कामगार आघाडी ,तसेच विविध वंचित आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां च्या प्रमुख उपस्थित मेळावा आयोजित करण्यात आला होता.


या मेळाव्यास मार्गदर्शन जिल्हा प्रभारी डॉ.क्रांती ताई सावंत व जिल्हा निरीक्षक अतुल बहुले यांनी केले .तसेच कार्यकर्त्यांचा विविध अडचणी जाणून घेतल्या .जिल्हा, तालुका कार्य कारनी व पदाधिकारी नेमणुका तसेच शाखा बांधणी व पक्ष संघटन वाढविण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्याचे यावेळी ठरवण्यात आले .तसेच पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत लवकरच जाहीर सभा आयोजित करण्याचा आग्रह कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी व्यक्त केला .

कार्यक्रमाचे सुत्र संचालन कोल्हापूर जिल्हा उत्तरचे संजय सुतार यांनी केले . यावेळी महाराष्ट्र युवक आघाडी सदस्य विश्वजित कदम , युवक आघाडी जिल्हाप्रमुख मिलींद सनदी, भारिप चे माजी जिल्हाध्यक्ष दिगंबर सकट आदींनी मनोगते व्यक्त केली .

मेळाव्यास संबोधित व कार्यक्र्त्यांच्या प्रश्नांची सडेतोड उत्तरे निरिक्षक अतुल बहुले यांनी दिली . तसेच जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले व वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक विंग्स ह्या एकमेकांना कश्या पुरक आहेत यांचे महत्व पटवून दिले.

महाराष्ट्रात प्रथमच प्रत्येक विंग्सला एका मंचावर आणण्याचे महत्वपूर्ण काम निरिक्षक अतुल बहुले यांनी केले . तसेच कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष कोल्हापूर जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष दयानंद कांबळे होते.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॅा क्रांतीताई सावंत यांनी सध्याच्या शासनाच्या अन्यायकारक धोरणांबाबत विवेचन केले. महिला संघटन व सबलीकरण व देशातील सद्यस्थितीचे राजकारण याबाबत विवेचन मांडले.
तसेच पक्ष कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागण्यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा उत्तरचे महासचिव सिद्धार्थजी कांबळे यांनी आपल्य मनोगतात मत मांडले. शेवटी आभार कामगार युनियनच् जिल्हा प्रमुख संजयजी गुदघे यांनी माडले . सर्व विंगच्या प्रमुखांनी एक दिलाने काम करण्याचा व जिल्यामध्ये वंचित वाढवून येणार्या निवडणूकीमध्ये आपले उमेदवार निवडूण आणण्याचा निर्धार व्यक्त केला .

       
Tags: KolhapurPrice riseVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

संयुक्त महाराष्ट्र, कामगार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

Next Post

बार्टी पी.एच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना UGC, NFHC, सारथी, महाज्योति अधिछात्रवृत्ती नियमांप्रमाणे पाच वर्षे कालावधी मंजूर करा अन्यथा आंदोलन – राजेंद्र पातोडे.

Next Post
बार्टी पी.एच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना UGC, NFHC, सारथी, महाज्योति अधिछात्रवृत्ती नियमांप्रमाणे पाच वर्षे कालावधी मंजूर करा अन्यथा आंदोलन – राजेंद्र पातोडे.

बार्टी पी.एच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना UGC, NFHC, सारथी, महाज्योति अधिछात्रवृत्ती नियमांप्रमाणे पाच वर्षे कालावधी मंजूर करा अन्यथा आंदोलन - राजेंद्र पातोडे.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध
बातमी

बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध

by mosami kewat
July 26, 2025
0

खामगाव : गाय चोरीच्या आरोपावरून एका बौद्ध तरुणाला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ खामगावात बौद्ध समाजाने आज वंचित बहुजन...

Read moreDetails
कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचले धागेदोरे

कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचले धागेदोरे

July 26, 2025
कळमनुरी PMKSY घोटाळा: VBA चे 'थाळी बजावो' आंदोलन, १५ ऑगस्टपर्यंत कारवाईची मागणी

कळमनुरी PMKSY घोटाळा: VBA चे ‘थाळी बजावो’ आंदोलन, १५ ऑगस्टपर्यंत कारवाईची मागणी

July 26, 2025
बीडमध्ये 'होडी चलाव' आंदोलन: धानोरा रोडच्या दुरवस्थेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

बीडमध्ये ‘होडी चलाव’ आंदोलन: धानोरा रोडच्या दुरवस्थेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

July 26, 2025
"केवळ गोरंट्याल नव्हे; राष्ट्रवादीचेही अनेक नेते भाजप प्रवेशासाठी उत्सुक काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा खुलासा"

राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप प्रवेशासाठी उत्सुक काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा खुलासा

July 26, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home