अकोला : विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे जयंती निमित्त भव्य अभिवादन बाईक रॅली वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने हुतात्मा चौक नेहरू पार्क चौक ते अशोक वाटिका असे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी नियोजन बैठक वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव आदरणीय राजेंद्र पातोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्किट हाउस अकोला येथे संपन्न झाली. बैठकीत आयोजन आणि बाईक रॅली बाबत जिल्हा आणि शहर भागात प्रचार करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा आणि महानगराच्या वतीने ८ एप्रिल पासून ते १३ एप्रिल २०२३ रोजी शहर व जिल्हा मध्ये प्रचार बैठक होतील.
युवा आघाडीचे बैठकीला सचिन शिराळे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख ॲड. प्रशिक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष करण वानखडे, ॲड. सुबोध डोंगरे, जिल्हा सचिव आनंद खंडारे, श्रीकृष्ण देवकुणबी, संतोष गवई, ॲड. मीनल मेंढे, सुजित तेलगोटे, महानगर पूर्व अध्यक्ष जय तायडे, पश्चिम अध्यक्ष आशिष मंगुळकर, संघटक रितेश यादव, बाळापूर तालुकाध्यक्ष संदीप वानखडे, महासचिव सचिन रोहनकर, अकोट तालुका संघटक नंदकिशोर मपारी, आशिष सरपटे, मनोज इंगळे, आशिष सोनोने, आकाश जंजाळ, मंगेश बलखंडे, धीरज इंगळे, किरण शिरसाट, प्रतुल विरघट, अक्षय डोंगरे, शेखर इंगळे, सुधीर वानखडे, महादेव वाघ, अमोल सोनोने, अभिषेक खोंड, देवरथ मानकर, नयन काळे, वैभव खडसे, नागेश उमाळे, ओमकार लांडगे, राहुल शेगोकार, प्रतीन ओवे, वैभव वाघमारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.