आठवले गटाच्या टपोरी, गावगुंड जिल्हाअध्यक्ष जगदिश गायकवाड विरुद्ध सिडकोची ५०० कोटी रूपये किमतीची जागा हडप केल्या प्रकरणी तसेच अवैध संपत्ती गोळा केल्या प्रकरणात वंचित युवा आघाडीची सीबीआय आणि ईडी कडे तक्रार दाखल.
मुंबई, दिनांक – २८ – वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने आज Joint Director (Intelligence) Headquarters Office,Directorate of Enforcement, Pravartan Bhawan, APJ Abdul Kalam Road, New Delhi आणि CID Joint Director, MUMBAI ZONE,Zone-I, CBI, 13th Floor, Plot No. C-35A, ‘G’ Block, Bandra Kurla Complex (BKC), Near MTNL Exchange, Bandra (East), Mumbai ह्यांचे कडे भ्रष्टाचारी जगदीश गायकवाड ला नागडे करणारी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे जगदीश गायकवाड विरोधात ह्या पूर्वी जनार्दन पाटील व इतर २, रा. रोडपाली, पो. नावडे, ता. पनवेल, जि. रायगड यांनी केलेल्या तक्रारीच्या प्रति सादर केलेल्या आहेत.
जनार्दन पाटील व इतर दोघांनी दाखल केलेल्या तक्रारी नुसार रोडपाली बौद्धवाडी सेक्टर १८ मधील जगदीश गायकवाड कंपनीचे अतिक्रमणे जमिनदोस्त करून तोडक कार्यवाहीचा खर्च वसुल करण्यासंदर्भात नियंत्रक अनधिकृत बांधकामे अधिकारी यांना आदेश / सुचना देण्याबाबतचा अर्ज मुख्यमंत्री सचिवालय कक्षात केलेला होता तसेच सिडको नियंत्रक अनधिकृत बांधकामे अधिकारी, सी.बी.डी. पोलीस स्टेशन आणि महापालिका आणि शासनाकडे लेखी तक्रार केली होती.मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही.त्यामध्ये रोडपाली बौध्दवाडीलगतची सर्व्हे व हिस्सा नं. २२ २६/१, २७/१, २८/२. २९/१. ३०, ५०/१, ५७/१ आणि ५७/२ या सिडको संपादीत जमिनीवर (साधारण पाच एकर) बौध्दवाडी मधील मधील जगदीश गायकवाड व त्यांच्या नातेवाईक व कुटूबियांनी अतिक्रमणे करून जागा हडप केली आहे अशी गंभीर तक्रार केली.त्या अतिक्रमणात त्यांनी ६ पाळी, व्यावसायिक गाळे, पार्किंग बांधकामे केली आहेत.सदर बांधकामा संदर्भात मा. आमदार जयंत पाटील साहेब यांनी अभिवेशनात सिडकोची साधारण ५०० कोटी रूपये किमतीची जागा हडप केल्या प्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तक्रारदार हे उपोषणाला बसणार होते. त्यावेळी सी.बी.डी. पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी आपल्या दालनात मिटींग लावून आपल्या अतिक्रमण विभागाने त्यांना लेखी आश्वासन दिले होते की आम्ही लवकरात लवकर कार्यवाही करू. पण आपण काहीही कार्यवाही केलेली नाही.सिडको नियंत्रक अनधिकृत बांधकामे अधिकारी, आपल्या कार्यालयाच्या मुळ हेतुला व आपल्या कामाला / कर्तव्याला जागुन रोडपाली बौध्दवाडी येथील सर्व्हे व हिस्सा नं. २२, २६/१, २७/१. २८/१, २९/१, ३०, ५०/२, ५७/१ आणि ५७/ २ जगदिश मंगल गायकवाड व त्याचे कुटुंबिय व नातेवाईक यांनी केलेली अतिक्रमणे पाडणे चे कारवाईच्या आदल्या दिवशी जगदिश मंगल गायकवाड व त्याचे कुटुंबिय गाडया पार्किंगसाठी सभोवती उभ्या करतात त्यादिवशी जे.सी.बी.च्या सहाय्याने मोठ-मोठे खड्डे पाडतात. जेणे करून तोडक कारवाईला ते आड आणण्याचे षडयंत्र करतात. तरी आपण ज्या गाडया पार्किंगला उभ्या आहेत. त्या गाडयांच्या मालकांना आपण नोटीस देऊन गाडया उचलून सिडकोच्या गोदामात ठेवावे.अशी मागणी होती.
परंतु सिडको नियंत्रक अनधिकृत बांधकामे अधिकारी यांनी या अगोदर मोपाम स्वरूपाच्या तोडक कारवाया केल्या आहेत. अशा कारणास्तव अतिक्रमण धारक पुन्हा त्याच ठिकाणी फक्त पाडलेले थोडके बांधकाम पुन्हा करून आपले अतिक्रमण पुन्हा होते तसे तो करतो. अशा प्रकारची कार्यवाही न करता सर्व अतिक्रमणे जमिनदोस्त करून ती जागा सिडकोने आपल्या ताब्यात घेवून तेथे तारेचे कुंपन टाकावे व पुन्हा त्याचठिकाणी अतिक्रमण केल्यास त्याच्यावर एम. आर. टी. पी. कायदयाप्रमाणे गुन्हा नोंद करावा आणि तोडक कार्यवाही साठी झालेला खर्च जगदीश मंगल गायकवाड व त्याचे कुटुंबिय व नातेवाईक यांच्याकडुन वसुल करण्यात यावा, अशी तक्रार होती. शासकीय ५०० कोटींची जमीन आरोपींनी हडपली आहे. त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात गैरमार्गाने अवैध संपत्ती देखील गोळा केली आहे. ही सर्व संपत्ती अवैध धंदे करून गोळा केलेली आहे. सबब गुंड प्रवृत्तीच्या मवाली जगदीश गायकवाड ची अवैध संपत्ती प्रकरणात चौकशी करून त्याचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत, आणि अवैध मार्गाने गोळा केलेली संपत्ती जप्त करण्यात यावी. शासकीय जमिन अवैध कब्जा करणे आणि गुंडागर्दी करणे ह्या साठी त्यास अटक करण्यात यावी, अशी मागणीची तक्रार युवा आघाडीचे निलेश विश्वकर्मा, प्रदेशाध्यक्ष, राजेंद्र पातोडे, महासचिव आणि राज्य कार्यकारणी सदस्य सर्वश्री अमित भुईगळ, शमीभा पाटील, अक्षय बनसोडे, ऋषीकेश नांगरे पाटील, विशाल गवळी, अफरोज मुल्ला, चेतन गांगुर्डे, सूचित गायकवाड, विश्वजित कांबळे, अमन धांगे, अमोल लांडगे, विनय भांगे सह वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश ह्यांनी केली आहे.