धुळे – राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचा झंझावात सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष मजबूत करायचा व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा झपाटा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीची धुळे जिल्ह्यात संपूर्ण जिल्हाभर पक्ष बांधणीसाठी मोहीम राबवली जात असताना ,धुळे येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष इम्रानभाई पठाण यांच्यासह संपूर्ण बीआरएसपीच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज धुळे येथे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष बापूसाहेब रविकांत वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांच्या अध्यक्षतेखाली बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष इम्रान भाई पठाण, शेख समद, रणजित वाघ, शेखर सोनवणे, मसूद अन्सारी, सलीम खाटीक, सुलतान अन्सारी, नईम अन्सारी, सय्यद सफिक, सय्यद शेख, समीर भाई, समीर शेख, अमीर शेख, शाहनवाज खान, इसरार शेख, जकिर शेख, शकील कुरेशी, गुलाब सूर्यवंशी, प्रवीण पाटील, युसुफ रंगरेज, प्रकाश पवार, इस्माईल शाह, मंजर मंसुरी, युसुफ शेख, सुधाकर पाटील, अकील खान, फिरोज खान, शोएब शेख शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी प्रवेश केला व आगामी काळात वंचित बहुजन आघाडीला सर्व जिल्हाभरात तळागाळापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पक्षाला पोचवायचा निर्धार या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी रईसभाई पत्रकार व जिल्हा उपाध्यक्ष, चंद्रमणी वाघ, भरतसिंग राजपूत, आकाश बागुल, सिरतल भाई खाटीक, मकंन माणिक, मुन्ना सरकार, रईस पटेल, भोजु सिंग रावल, सुभाष पाटील व अमोल पवार उपस्थित होते.