जिल्ह्यातील गट प्रमुख व गण प्रमूख यांचा घेतला आढावा
बीड – आगामी काळातील सर्व स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याच्या तयारीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लागावे, पक्ष संपुर्णपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. संघटनात्मक बांधणीवर भर, पक्ष सभासद नोंदणी जास्तीत जास्त करून पक्ष बळकटी करनावर भर द्यावा, असे प्रतिपादन प्रा. किसन चव्हाण यांनी केले.
शासकिय विश्रामगृह येथील बीड, गेवराई, पाटोदा, शिरूर येथील पदाधिकारी हे उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी (प) बीड ची शासकीय विश्रामगृह येथे बैठकीत मार्गदर्शन करताना राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी प्रा. किसन चव्हाण, शिस्तपालन समिती तथा तक्रार निवारण राज्य प्रमुख प्रा. विष्णु जाधव, मालेगाव – नाशिक निरिक्षक डॉ.नितिन सोनवणे, जिल्हा अध्यक्ष उद्धव खाडे, संतोष जोगदंड, बबन वडमारे, ज्ञानेश्वर कवठेकर, आनंतराव सरवदे, आनुंरत वीर सुदेश पोतदार, युनुस शेख, पुष्पाताई तुरूकमारे, बालाजी जगतकर, अजय सरवदे, देविदास जंगले, पप्पु गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, किशोर भोले, भिमराव पायाळ, लखन जोगदंड, संदिप जाधव, विश्वजित डोंगरे, उमेश तुळवे आदी पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचलन किशोर भोले तर आभार उद्धव खाडे यांनी मानले.
बलभिम उबाळे चराटेकर यांचा प्रा. किसन चव्हान, प्रा.विष्णु जाधव, डॉ नितिन सोनवणे, उद्धव खाडे, युनुस शेख यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश घेतला. ते मराठा समाजाचे असुन त्यांच्या पक्ष प्रवेशाने बीड तालुक्यात पक्ष अधिक बळकट होणार आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.