Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home विशेष

तुझ्या जन्माआधी,

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 13, 2022
in विशेष
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारण
       
गावगाड्याच्या आगीत होरपळत,
दारिद्र पुजत, वाहत होतो आयुष्याची प्रेतं.
चावडी, महारवाड्याच्या पलिकडे नव्हतं अस्तित्व,
झालं नव्हतं कधीच सिमोल्लंघन जातीच्या
दळभद्री चौकटीतून.

फेडत होतो मरीआईचा नवस,
म्हसोबाला नारळ,
कुण्या फकीराचे अंगारे-घुपारे चोपडत,
गुलाल भंडारे उधळत
सडत होतो गावकुसाबाहेर.

विज्ञान कशासोबत खातात नव्हता पत्ता,
प्रतिष्ठा, स्वाभिमान याचा नव्हता मागमूस,
जातीने बांधलेल्या साखळदंडाला
ऐवज मानत अजून जोरात
आवळत होतो सर्वांगाला.

पण जेव्हा तु उभा ठाकलास दंड थोपटून
पाण्याला आग लावत,
चातुर्वर्णाचे इमले ढासळवत,
जातिय घार्मिक वर्गिय विकृतीचे कळस मोडत,
गुलामीचे साखळदंड तोडत,
उच-निचतेचे मनोरे भेदत,
तेव्हा तु मला आभाळाहुन उंच वाटत आलायेस.

जोखडातून मुक्त करत,
गावकुसाबाहेरुन काढत, दिलंस हक्काच स्थान
गाववेशीपासून संसदेपर्यंत.
स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा जयघोष करत
तु हाती दिलास बुद्ध, दाखविलास सन्मार्ग
सम्यक संबुद्धांचा.

शोषितांच्या दबलेल्या नरड्याला
बुलंद आवाज देत तु ठरलास
शुद्ध स्वच्छ ऑक्सिजन,
यापुढेही येणार्या शेकडो पिढ्यांना
हा ज्वलंत ऑक्सिजन
कायमच देत राहील अफाट बळ
कायमच देत राहील अफाट बळ…

  • सचिन आनंदराव तुपेरे
  • १३-०४-२०२२

Tags: babasahebambedkarJayanti
Previous Post

पाच राज्यांतील निवडणुका : उत्तरोत्तर कठीण होत जाणारी प्रश्नपत्रिका!

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला आपले मानले. – प्रा. अंजलीताई आंबेडकर

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला आपले मानले. – प्रा. अंजलीताई आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला आपले मानले. - प्रा. अंजलीताई आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इबोला कोरोनापेक्षाही डेंजर, WHO ने घोpषित केली आंतरराष्ट्रीय आणीबाणी; परदेशातून येणाऱ्यांची आता पुणे विमानतळावर होणार तपासण
Uncategorized

इबोला कोरोनापेक्षाही डेंजर, WHO ने घोpषित केली आंतरराष्ट्रीय आणीबाणी; परदेशातून येणाऱ्यांची आता पुणे विमानतळावर होणार तपासण

by mosami kewat
May 26, 2026
0

पुणे : इबोला विषाणूच्या वाढत्या lपार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासन सतर्क झाले असून, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी सुरू...

Read moreDetails
बोईसर ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ कारवाईविरोधात बेमुदत धरणे आंदोलन; १५ दिवस उलटूनही प्रशासन सुस्त!

बोईसर ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ कारवाईविरोधात बेमुदत धरणे आंदोलन; १५ दिवस उलटूनही प्रशासन सुस्त!

May 25, 2026
४५ अंशाचा पारा अन् महागाईचा जाळ! इंधन दरवाढीविरोधात अकोल्यात वंचितचा भव्य बैलगाडी मोर्चा; बैलगाडी, गाढव, घोडे आणि सायकलने वेधले लक्ष

४५ अंशाचा पारा अन् महागाईचा जाळ! इंधन दरवाढीविरोधात अकोल्यात वंचितचा भव्य बैलगाडी मोर्चा; बैलगाडी, गाढव, घोडे आणि सायकलने वेधले लक्ष

May 25, 2026
Boisar Women Entrepreneurs : पीडित महिला व्यावसायिकांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Boisar Women Entrepreneurs : पीडित महिला व्यावसायिकांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

May 25, 2026
उद्यापासून पुण्यात १४ दिवसांची जमावबंदी ; नेमकं कारण काय ?

उद्यापासून पुण्यात १४ दिवसांची जमावबंदी ; नेमकं कारण काय ?

May 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home