नागपूर – वंचित बहुजन आघाडीने संपुर्ण महाराष्ट्रात “युवा जोडो” अभियान राबविले असून, इतर पक्षात जिथे २५-३० वर्ष काम केल्यानंतर सुध्दा युवकांना संधी दिली जात नाही, तिथे वंचित बहुजन आघाडीतर्फे सक्षम युवकांना मोठ्या प्रमाणात निवडनुकीमध्ये संधी दिली जाईल अशी ग्वाही पक्षाच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी नागपूरच्या रवीभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
नागपूर शहर व जिल्हा ग्रामीणच्या युवक कार्यकारिणीकरिता मुलाखती घेण्यात आल्या. ज्यामधे मोठ्या प्रमाणात युवकांनी सहभाग घेतला. दरम्यान पत्रकारांशी बोलतांना विश्वकर्मा यांनी सांगितले की, नागपूर महानगरपालिका निवडनुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या विजयाचे शिल्पकार हे युवकच राहणार आहे, याकरीता युवकांना पक्षाची मोठी जिम्मेदारी देण्याचे कार्य सुरू आहे, ज्यामधूनच समोर सक्षम नेतृत्व उदयास येईल.
या पत्रपरिषदेत युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, शहर अध्यक्ष रवी शेंडे, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विलास वाटकर उपस्थित होते.