Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश; रेणापूर–उदगीर महामार्गावर अखेर गतिरोधकांची उभारणी

mosami kewat by mosami kewat
October 30, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश; रेणापूर–उदगीर महामार्गावर अखेर गतिरोधकांची उभारणी
       

रेणापूर  : रेणापूर–उदगीर महामार्गावरील रेणापूर ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय, न्यायालय व विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला होता. या मार्गावर गतिरोधक उभारण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. गुरुवारी (दि.२९) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणी गतिरोधकांची उभारणी करण्यात आली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

रविवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी रेणापूर येथे भीषण अपघातात घडला. या अपघातात तीन जणांना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती. रेणापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या मावस बहिणीला भेटण्यासाठी आलेल्या भाऊ-बहिणीचा अपघातात मृत्यू झाला, तर एका लहान बालकाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

या अपघातानंतर संबंधित रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच, या अपघातांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाला जबाबदार धरत तातडीने गतिरोधक उभारण्याची मागणी करण्यात आली होती.

या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या पाठपुराव्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रेणापूर–उदगीर महामार्गावरील संबंधित ठिकाणी गतिरोधकांची उभारणी केली.

रेणापूर–उदगीर महामार्गाचे उद्घाटन तहसीलदार संदिप पाटील, नायब तहसीलदार तानाजी यादव, मंडळ अधिकारी संजय घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रतन आचार्य, माजी तालुकाध्यक्ष खय्युम शेख, तालुका महासचिव विशाल मस्के, तालुका संघटक कृष्णा वाघमारे, प्रसिद्धीप्रमुख अक्षय ससाणे, युवक कार्यकर्ते किशोर कांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रेणापूर शहरातील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या या मार्गावर नागरिकांची व वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक उभारल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यास आणि भविष्यात अपघातांचा धोका कमी करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या या आंदोलनाला यश मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


       
Tags: MaharashtraPoliticalRenapurVanchit Bahujan Aghadi
Previous Post

अहमदनगर वृक्षतोड प्रकरण: दोषी वन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश; रेणापूर–उदगीर महामार्गावर अखेर गतिरोधकांची उभारणी
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश; रेणापूर–उदगीर महामार्गावर अखेर गतिरोधकांची उभारणी

by mosami kewat
October 30, 2026
0

रेणापूर  : रेणापूर–उदगीर महामार्गावरील रेणापूर ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय, न्यायालय व विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचा धोका...

Read moreDetails
अहमदनगर वृक्षतोड प्रकरण: दोषी वन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

अहमदनगर वृक्षतोड प्रकरण: दोषी वन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

October 30, 2026
निंबा येथील अन्यायग्रस्त शेतकरी राठोड कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीकडून आर्थिक मदत

निंबा येथील अन्यायग्रस्त शेतकरी राठोड कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीकडून आर्थिक मदत

October 30, 2026
ज्ञानेश कुमार हटाव मार्च आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

इथला आंबेडकरवादी लोकशाही रक्षासाठी लढत राहील – सुजात आंबेडकर

October 29, 2026
भाजपकडून फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा दाबण्याचा प्रयत्न – भीमराव आंबेडकर

भाजपकडून फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा दाबण्याचा प्रयत्न – भीमराव आंबेडकर

October 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home