मुंबई : निवडणुकांतील गैर कारभाराच्या विरोधात ज्ञानेश कुमार हटाव मार्च वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि.28 ऑक्टोबर रोजी मुंबईत काढण्यात आला होता. या मार्चला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केले. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएस यांच्यावर सडकून टीका केली. भाजप आरएसएस फुले शाहू आंबेडकरी विचारधारा दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले.
2019 च्या निवडणुकीत आंबेडकरवादी जनतेने घोषणा केली की ईव्हीएम मे झोल है परंतु देशातील विरोधी पक्ष त्यावर सिरियस नव्हता 2024 मध्ये आपणच हा मुद्दा लावल्यावर त्यांना थोडी जाग आली. या देशातील परिस्थिती देखील बदलावी लागेल हजारोंच्या संख्येने चैत्यभूमी जवळ आणि जंतर-मंतरवर आपल्या हक्कासाठी जेन – झी मुलं एकत्र आली आणि राजीनामा झाला. दोन गुजराती हा देश चालवत आहेत आणि दोन गुजराती हा देश विकत असल्याचे म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला.






